CISF जवानाने पत्नीसह ३ लोकांची केली हत्या

किश्तवाड जिल्ह्यातील सीआयएसएफ जवानाने आपल्या पत्नीसह इतर ३ लोकांची हत्या केली आहे. कारण 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 30, 2017, 04:57 PM IST
CISF जवानाने पत्नीसह ३ लोकांची केली हत्या  title=

जम्मू काश्मीर : किश्तवाड जिल्ह्यातील सीआयएसएफ जवानाने आपल्या पत्नीसह इतर ३ लोकांची हत्या केली आहे. कारण 

गुरूवारी आपल्या यूनीटमध्ये पत्नी आणि सहकर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स यूनिटमधली घटना आहे.  

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाला आपल्या पत्नीवर संशय होता की तिचं विवाहबाह्य संबंध होते. याच संशयामुळे जवानाने आपल्या पत्नीसह ३ कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली. संशय घेत त्या जवानानेच आपल्या सर्विस बंदूकमधून गोळ्या झाडली. या जवानाला स्थानिक पोलिसांनी अटक केली असून या जवानाला २ मुलं आहे. 

दिल्लीतून आयएसएफचे ओ पी सिंह यांनी मीडियाला सांगितले की, आम्ही आरोपिला निलंबित केले आहे. तसेच यांच्या दोन्ही मुलांची काळजी अर्ध्दसैनिक दल घेणार आहे. हा आरोपी जवान २०१४ मध्ये सीआयएसएफमध्ये सहभागी झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून एक कुटूंब उध्वस्त झालं आहे.