Chhota Rajan | कुख्यात गुंड छोटा राजनच्या मृत्यूच्या बातमीमुळे गोंधळ, राजन जिवंत-एम्स

कुख्यात गुंड छोटा राजन यांचा दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: May 7, 2021, 06:24 PM IST
Chhota Rajan | कुख्यात गुंड छोटा राजनच्या मृत्यूच्या बातमीमुळे गोंधळ, राजन जिवंत-एम्स title=

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग देशभरात बेफाम गतीने वाढत आहे. अनेकांचे प्राण कोरोनाच्या महामारीने घेतले आहेत. कुख्यात गुंड छोटा राजन यांचा दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे माहिती सुत्रांनी दिली. परंतु एम्सच्या अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळले असून. राजन जिवंत असल्याचं म्हटलं आहे.

अंडरवर्ल्ड डॉन  छोटा राजन यालाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच राजनला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी त्याला एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. आज कोरोनामुळे एम्समध्येच त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु एम्सकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार अधिकाऱ्यांनी छोटा राजन जिवंत असून त्यावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. राजन सध्या तिहार तुरूंगात शिक्षा भोगत होता. 

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी
छोटा राजन 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता. छोटा राजनचं खरं नाव राजेंद्र निकाळजे असं होतं.  2015 साली इंडोनेशियातील बाली येथून राजनला प्रत्यार्पन करून भारतात आणण्यात आलं होतं. तेव्हापासून तो दिल्ल्लीतील तिहार तुरूंगात शिक्षा भोगत होता. 

वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येचाही आरोप राजन यांच्यावर होता. याप्रकरणी राजनला आजीवन तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हेही वाचा

१) मोठा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन पुढे आला...

२) छोटा राजनच्या नावाची दहशत सुरू झाली या घटनेवरून...

३) दाऊद-छोटा राजनची पहिली भेट, मोठा राजनच्या हत्येचा बदला

४) छोटा राजन आणि दाऊदच्या मैत्रीत असं काही झालं....

५) छोटा राजन आणि दाऊदची 'ही दोस्ती तुटायची नाय'...पण

६) दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!

७) छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"

८) छोटा राजनला अखेर पत्रकाराची हत्या महागात पडली