वंडर किड : न थांबता २० कोटींपर्यंतचे पाढे म्हणतो चिराग

लहानपणी शाळेत असताना तुम्ही पाढे नक्कीच पाठ केले असतील. तुम्हाला कितीपर्यंतचे पाढे पाठ होते २०...३० जास्तीत जास्त ५० ते १००...मात्र उत्तर प्रदेशच्या सहारणपूरमधील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला तब्बल २० कोटींपर्यंतचे पाढे पाठ आहेत.

Updated: Jan 19, 2018, 08:53 AM IST
वंडर किड : न थांबता २० कोटींपर्यंतचे पाढे म्हणतो चिराग title=

सहारणपूर : लहानपणी शाळेत असताना तुम्ही पाढे नक्कीच पाठ केले असतील. तुम्हाला कितीपर्यंतचे पाढे पाठ होते २०...३० जास्तीत जास्त ५० ते १००...मात्र उत्तर प्रदेशच्या सहारणपूरमधील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला तब्बल २० कोटींपर्यंतचे पाढे पाठ आहेत.

हे वाचून तुम्हालाही धक्का बसला ना? चिराग असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. चिरागची ही हुशारी पाहून प्रत्येक जण हैराण आहे. चिरागचे आई-वडील तसेच त्याच्या शिक्षकांना याचा अभिमान आहे. 

ही अद्भुत प्रतिभा लाभलेला चिराग सहारणपूर येथील गरीब घरातील आहे. चिरागला मोठे होऊन वैज्ञानिक व्हायचेय आणि देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. 

मोदींनी माझ्या गावात यावे

चिरागला जेव्हा विचारण्यात आले की त्याला कोणती राजकीय व्यक्ती आवडते तेव्हा तो म्हणाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माझ्या गावी भेट द्यावी अशी इच्छा आहे.

चिरागचे वडील नरेंद्र सिंह म्हणाले, आम्ही खूप गरीब आहोत. अनेकदा तर दोनवेळचे जेवण मिळवणेही कठीण असते. माझ्या मुलाला वैज्ञानिक व्हायचेय. मात्र माझ्याकडे तितकेसे पैसे नाहीत. मी माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण करेन की नाही हे माहीत नाही. मात्र त्यासाठी जरुर प्रयत्न करेन.