High Court Verdict On Wife Petition On Divorce: छत्तीसगड हायकोर्टाने (Chhattisgarh High Court) घटस्फोट (Divorce) रद्द करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहत दिलेला निकाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पतीने केलेल्या अर्जाच्या आधारावर फॅमेली कोर्टाने पती-पत्नीदरम्यान मोठे मतभेद निर्माण झाल्याचं सांगत घटस्फोट मंजूर केला आहे. कोर्टाने आजच या घटस्फोटच्या प्रकरणी निकाल सुनावला. या प्रकरणाविरोधात पत्नीने छत्तीसगड हायकोर्टामध्ये याचिका केली. या याचिकेमध्ये घटस्फोटाचा आधीचा निर्णय चुकीचा ठरवून तो रद्द करावा असं पत्नीने म्हटलं होतं.
या प्रकरणामध्ये कोर्टाच्या डिव्हीजनल बेंचने या प्रकरणाशी संबंधित सर्व गोष्टींचा विचार करत पुराव्यांच्या आधाराने पत्नीचा व्यवहार पतीवर अत्याचार करणार असल्याचं म्हटलं. पतीवर अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करुन त्याच्या ऑफिसमध्ये गोंधळ घालणे क्रुरतेच्या श्रेणीमध्ये येतं. या प्रकरणामध्ये हायकोर्टाच्या डिव्हीजनल ब्रँचने पत्नीची याचिका रद्द करताना फॅमेली कोर्टाने सुनावलेला निकाल कायम ठेवला आहे.
धमतरी जिल्ह्यातील कुरुद येथील सब इंजीनियअरने 2010 मध्ये रायपूरला राहणाऱ्या एका विधवा महिलेबरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर काही वर्षांपर्यंत सर्व काही ठीक चाललं होतं. यादरम्यान त्यांना एक मुलंही झालं. मात्र मागील काही वर्षांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. पत्नीने पतीवर कुटुंबापासून वेगळं राहण्यासाठी दबाव टाकू लागली. पतीनेही सामंजस्याने या प्रकरणावर तोडगा काढत परिवाराच्या संमतीने आपल्या आई-वडीलांपासून वेगळा राहु लागला. यानंतर पत्नीने आपल्या पतीवर सहकारी महिलेबरोबर शरीरसंबंध असल्याचे आरोप करण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये याच मुद्यावरुन वारंवार वाद होऊ लगाले.
पत्नी अनेकदा आपल्या पतीचे आणि त्याच्या सहकारी महिलेचे संबंध असल्याचे आरोप करत पतीच्या ऑफिसमध्ये पोहचायची. ती मोठमोठ्याने आरडाओरड करुन पतीबद्दल सर्वांसमोर गैरशब्द वापरायची. याच कारणामुळे पतीने फॅमेली कोर्टामध्ये अर्ज करत घटस्फोटाची मागणी केली. याशिवाय एका मंत्र्याबरोबर पतीचे बेकायदेशीर संबंध असल्याचा आरोप करत कुटुंब वाचवण्यासाठी पतीची बदली करावी असा अर्जही या महिलेने पतीच्या ऑफिसमध्ये केला होता. या सर्व गोष्टींना कंटाळून इंजीनियर पतीने फॅमेली कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आणि कोर्टाने हा घटस्फोट मंजूर केला.
घटस्फोटाच्या निर्णयाविरोधात पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने अनैतिक संबंधांच्या आधारावर पतीच्या बदलीची मागणी तसेच सहकाऱ्याबरोबर अनैतिक संबंध असल्याचे आरोप याचबरोबर न्यायालयात जाऊन गोंधळ घालणे पत्नीची क्रूरता दाखवून देते, असं निरिक्षण नोंदवलं. या प्रकरणामध्ये फॅमेली कोर्टाने दिलेला निर्णय योग्य असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.