'त्या' मंत्र्याच्या सेक्स सीडी प्रकरणाची होणार CBIद्वारे

छत्तीसगढ सरकारमधील मंत्री राजेश मूणत यांच्याशी संबंधीत पुढे आलेल्या कथीत सेक्स सीडी प्रकरणाची अखेर सीबीआयद्वारे चौकशी होणार आहे. रमणसिंह सरकारने शनिवारी हा निर्णय घेतला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 28, 2017, 09:00 PM IST
'त्या' मंत्र्याच्या सेक्स सीडी प्रकरणाची होणार CBIद्वारे  title=

रायपूर : छत्तीसगढ सरकारमधील मंत्री राजेश मूणत यांच्याशी संबंधीत पुढे आलेल्या कथीत सेक्स सीडी प्रकरणाची अखेर सीबीआयद्वारे चौकशी होणार आहे. रमणसिंह सरकारने शनिवारी हा निर्णय घेतला.

रमणसिंह सरकारमधील मंत्री प्रेम प्रकाश पांडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, मूणत यांच्याशी संबंधीत सेक्स सीडी प्रकतरण हे एक षडयंत्र आहे. मात्र, त्यापूर्वी मंत्री राजेश मूणत यांनी आपल्या पदाचा राजीनमा दिला आहे. तर, या प्रकरणात ब्लॅकमेलिंग आणि मानहानी आदी आरोपांखाली पत्रकार विनोद वर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, छत्तीसगढ पोलिसांनी पत्रकार विनोद वर्मा यांना गाजियाबाद मधील इंदिरापुरम येथून त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. दुसऱ्या बाजूला मंत्री राजेश मूणत यांनी आगोदरच आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना मूणत यांनी सांगीतले की, आपल्याला या प्रकरणाबद्धल सुरूवातीला माहिती नव्हती. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ही कथीत सीडी आणि या प्रकरणाबद्धल माहिती मिळाली.

या प्रकरणात पत्रकार विनोद वर्मा यांच्याविरूद्ध छत्तीसगढ पोलिसांनी पंडरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्यावर आयपीसी कलम ३८४, ५०६ आणि आयटी अॅक्ट अन्वये आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपांखालीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून तब्बल ५०० सीडी, २ लाख रूपये रोख रक्कम, एक लॅपटॉप आणि एक डायरी जप्त केल्याचीही माहिती आहे.