Cheque Bounce : जर तुम्ही एखाद्याला पैसे देण्यासाठी चेक वापरत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. कारण चेक बाऊन्सच्या नियमांमध्ये सरकार मोठा बदल करणार आहे. चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे कायदेशीर यंत्रणेवर दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. चेक बाऊन्सची प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्यासाठी केंद्र सरकारचा लवकरच एक नवीन नियम लागू शकते ज्यासाठी अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. ()
इंडस्ट्री बॉडी PHD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (Chamber of Commerce and Industry) अलीकडेच वित्त मंत्रालयाला विनंती केली होती की, चेक बाऊन्स झाल्यास काही दिवसांसाठी बँकेतून पैसे काढण्यावर बंधनकारक स्थगिती यासारखी पावले उचलावीत जेणेकरून धनादेश जारी (Issue a check) करणार्यांना जबाबदार धरता येईल. हा नवा नियम अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) लागू केल्यास चेक जारी करणाऱ्याच्या दुसऱ्या खात्यातून पैसे कापले जातील. यासोबतच इतर बँकांमध्ये नवीन खाती उघडण्यावरही बंदी घातली जाऊ शकते. अर्थ मंत्रालय अशा अनेक पावलांवर विचार करत आहे.
क्रेडिट स्कोअर कमी असू शकतो
खरे तर चेक बाऊन्स प्रकरणांमुळे कायदेशीर यंत्रणेवरचा भार वाढतो. त्यामुळे अशा काही सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेपूर्वी काही पावले उचलावी लागतील. उदाहरणार्थ, चेक जारी करणाऱ्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास त्याच्या इतर खात्यातून रक्कम वजा करणे. सूत्रांच्या मते, इतर सूचनांमध्ये चेक बाऊन्सच्या (Cheque Bounce) प्रकरणाला कर्ज डिफॉल्ट म्हणून हाताळणे आणि (Credit) माहिती कंपन्यांना अहवाल देणे समाविष्ट आहे. यानंतर चेक जारी करणाऱ्याचा क्रेडिट स्कोअर कमी केला जाऊ शकतो. या सूचना स्वीकारण्यापूर्वी कायदेशीर मत घेतले जाईल.
वाचा : 'ही' मोठी बँक आजपासून बंद, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?
नवीन नियमामुळे हे मोठे फायदे होतील
वित्त मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या या सूचनांची अंमलबजावणी झाल्यास पैसे देणाऱ्याला चेक भरण्यास भाग पाडले जाईल. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात नेण्याची गरज भासणार नाही. यामुळे व्यवसाय करण्याची सुलभता वाढेल आणि खात्यात पुरेसे पैसे नसतानाही धनादेश देण्याची प्रथा बंद होईल. चेक जारीकर्त्याच्या इतर खात्यातून रक्कम आपोआप वजा करण्यासाठी मानक कार्यप्रणाली आणि इतर सूचनांचे पालन करावे लागेल. चेक बाऊन्स झाल्याची केस कोर्टात दाखल केली जाऊ शकते आणि हा दंडनीय गुन्हा आहे जो चेकच्या दुप्पट रकमेपर्यंत वाढू शकतो किंवा दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्हीही होऊ शकतो.