डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास मेजवानीचा बेत

पानात वाढले जाणार हे पदार्थ.... 

Updated: Feb 24, 2020, 10:33 AM IST
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास मेजवानीचा बेत title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी सारा देश सज्ज होत असतानाच  president donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचीही विशेष काळजी घेण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासाठी खास मेजवानीचा बेत आखण्यात आला आहे. याची जबाबदारी गुजरातमधील फॉर्च्युन लँडमार्क या हॉटेलमधील Chef Suresh Khanna शेफ सुरेश खन्ना यांच्यावर असणार आहे. 

आपल्यावर दिलेल्या या जबाबदारीविषयी खन्ना यांनी वृत्तमाध्यमांशी संवाद साधतना माहिती दिली. एएनायच्या वृत्तानुसार खन्ना यांनी या खास मेजवानीविषयीची काही माहितीही दिली. 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यश्रांसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जेवण बनवण्याची संधी मिळणं ही अतिशय सुरेख आणि आनंददायी बाब आहे. सरकारकड़ून करण्यात आलेल्या मागणीवर आमची पूर्ण टीम काम करत आहे. यामध्ये वाफवलेल्या आणि उकडलेल्या पदार्थांचा वापर असेल. शिवाय मसाल्यांचाही कमीत कमी वापर असेल', असं ते म्हणाले. 

ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीसाठी बवनण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये गुजराती पदार्थांचा खास वावर दिसणार आहे. खमण, ब्रोकोली समोसा, हनी डीप कुकीज, मल्टी ग्रेन रोटी आणि बेसनपासून बनवण्यात आलेले काही पदार्थांचा समावेश या प्लॅटरमध्ये असेल. 

Chef Suresh Khanna and his team will be responsible for cooking the meal for Donald and Melania Trump during their visit

'ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीला खमण फारच आवडत असल्यामुळे हा पदार्थ आवर्जून बनवण्यात येणार आहे. सर्व पदार्थ हे शाकाहारी असतील. शिवाय ते गुजराती पद्धतीने बनवलेले असतील. पदार्थांची रितसर चाचणीही होणार आहे. ज्यानंतरच ते पाहुण्यांच्या पानात वाढले जाणार आहेत', असंही शेफ खन्ना म्हणाले. 

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

अनेक मानाच्या आणि दिग्गज मंडळींसाठी मेजवानी बनवण्याचा अनुभव असणाऱ्या शेफ खन्ना यांच्यासाठीसुद्धा हा मोठा क्षण आहे. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नावाचा समावेश आहे. या अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसाठीसुद्धा त्यांनी आपली पाककला दाखवली आहे.