'इस्त्रो वो है, जहा मुश्किले शर्मिंदा है' सेहवागने जिंकली नेटकऱ्यांची मने

  माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने इस्त्रोच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

Updated: Sep 7, 2019, 04:09 PM IST
'इस्त्रो वो है, जहा मुश्किले शर्मिंदा है' सेहवागने जिंकली नेटकऱ्यांची मने title=

मुंबई : चांद्रायान-२ मोहिमेला यश आले नाही. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला आहे. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना मोठा धक्का बसला. मात्र, देशाभरातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने इस्त्रोच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

ISRO loses contact with Chandrayaan-2's Vikram Lander 2.1 km above moon, data being analysed

श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून २२ जुलै रोजी झेपावलेले चांद्रायान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे भारतीयांचा थोडासा हिरमोड झाला. पण इस्त्रोच्या प्रयोगाचे आणि प्रयत्नांचे साऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले. सेहवागने इस्त्रोच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना सलाम केला.

ख्वाब अधूरा रहा पर हौसलें जिंदा है | इस्त्रो वो है, जहा मुश्किले शर्मिंदा है | हम होंगे कामयाब.. अशा शब्दात सेहवागने ट्विट केले. “स्वप्न जरी अपूर्ण राहिले असेल तरी आपण खचून जायचे नाही. आपल्यातील आशावाद कायम जिवंत ठेवला पाहिजे. आपण नक्कीच यशस्वी होऊ, असे ट्विट करत सेहवागने इस्त्रोच्या कामगिरीचे कौतुक केले.