आश्चर्य... या मुलाची हाडे तुटतात आणि आपोआप जोडलेही जातात!

एखादं हलकसं काम करताना किंवा बसल्या जागी एखाद्या व्यक्तीची हाडे तुटलीय, असं तुम्ही कधी ऐकलंत का? इतकंच नाही तर, हाडे तुटल्यानंतर ते आपोआपच जोडलेही जातात... असं सांगितलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही... पण, हे खरं आहे!

Updated: Oct 28, 2017, 10:22 PM IST
आश्चर्य... या मुलाची हाडे तुटतात आणि आपोआप जोडलेही जातात! title=

अमृतसर : एखादं हलकसं काम करताना किंवा बसल्या जागी एखाद्या व्यक्तीची हाडे तुटलीय, असं तुम्ही कधी ऐकलंत का? इतकंच नाही तर, हाडे तुटल्यानंतर ते आपोआपच जोडलेही जातात... असं सांगितलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही... पण, हे खरं आहे!

पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात असा एक ७ वर्षीय मुलगा आहे... ज्याच्या शरीरातील हाडे बसल्या बसल्या तुटतात आणि पुन्हा जोडलेही जातात... या चिमुरड्याचं नाव आहे गुरताज सिंह... 

पण, गुरताजच्या अंगी असणारी ही कोणतीही दैवी शक्ती वगैरे नाही... गुरताज एका व्याधिनं ग्रस्त आहे... त्याच्या जन्मापासूनच हा आजार त्याच्याशी जोडला गेलाय. 'ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा' असं या आजाराचं नाव...  

गुरताजची हाडे खेळता-खेळता तुटतात आणि काही वेळेनंतर आपोआप जोडलेही जातात. या दरम्यान त्याला अत्यंत क्लेशदायक त्रासातून जावं लागतं. याच आजारामुळे त्याचा शारीरिक विकासही रोखला गेलाय. गुरताज जरी सात वर्षांचा असला तरी तो दिसतो मात्र एखाद्या दोन-अडीच वर्षांच्या मुलाएवढा... त्याला अजून नीट चालताही येत नाही.

गुरताजची आई पलविंदरनं दिलेल्या माहितीनुसार, २०१० साली गुरताजच्या जन्मानंतर केवळ एका महिन्यात त्याच्या या आजाराबद्दल समजलं होतं... हे ऐकल्यानंतर कुटुंबावर मोठा आघातच झाला होता... अशातच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं गुरताजच्या वडिलांचं निधन झालं.