मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत राष्ट्रीय धोरणात मोठा बदल केला आहे. आतापर्यंत, कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी अनिवार्य होता. पण आता हा नियम बदलण्यात आला आहे. वेळेत रिपोर्ट मिळत नसल्याने बर्याच वेळा रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागला. यामुळे बर्याच रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवीन धोरण 3 दिवसांच्या आत लागू केले जाणार आहे. (COVID Treatment Guidelines)
या धोरणांतर्गत अशा संशयित रूग्णांना रुग्णलयात प्रवेश मिळू शकेल. यामध्ये कोविड केअर सेंटर, संपूर्णपणे समर्पित कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल यांचा समावेश आहे. तसेच नवीन धोरणात हे स्पष्ट केले आहे की रूग्ण कोणत्याही राज्यातला असला तरी त्याला रुग्णालयात दाखल केले जावे. कोणत्याही पेशंटला कोठेही प्रवेश दिला जाऊ शकतो.
आरोग्य मंत्रालयाने ओळखपत्र नसलेल्यांना लसी देण्याबाबत ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार अशा लोकांची कोविन अॅपवर नोंदणी केली जाईल आणि अशा लोकांना लसींसाठी विशेष सत्रांचे आयोजन केले जाईल. या लोकांना ओळखण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल.
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 3 दिवस ताप येऊन गेल्यानंतर 10 दिवस होम आइसोलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांना कोणतेही लक्षणं नसले तर अशा व्यक्ती होम आयसोलेशनमधून बाहेर येऊ शकतात. त्यांना टेस्टिंगची आवश्यकता नाही. आरोग्य अधिकारी याबाबत निर्णय घेतील. पण होम आयसोलेशनसाठी व्यक्तीच्या घरात तशी सुविधा असल्या पाहिजेत. कोरोना संक्रमित व्यक्तीचं आक्सीजन सॅचुरेशन 94 असलं पाहिजे.
होम आयसोलेशनमध्ये ऑक्सीमीटर जवळ असलं पाहिजे. वेळेवेळी त्याने ऑक्सीजन लेवल चेक करत राहिले पाहिजे. श्वास घेताना त्रात होत असेल आणि ऑक्सीजन लेवल कमी होत असेल तर रुग्णालयात दाखल होणं गरजेचं आहे.