CBSE Term 2 Exam Date: CBSE बोर्डाच्या दहावी, बारावी टर्म दोन परीक्षेच्या तारखा जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी, बारावीच्या टर्म 2 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

Updated: Feb 9, 2022, 08:13 PM IST
CBSE Term 2 Exam Date: CBSE बोर्डाच्या दहावी, बारावी टर्म दोन परीक्षेच्या तारखा जाहीर title=

CBSE Term 2 Exam Dates Released : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी, बारावीच्या टर्म 2 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. सीबीएसईने परीक्षेच्या तारखेबाबत नोटीस जारी करून ही माहिती दिली आहे. CBSE ने दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावाची परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होईल. परीक्षांचे डेटशीट अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर प्रसिद्ध केली जाईल.

परीक्षा ऑफलाईन होणार
देशातील कोविड-19 ची सद्य परिस्थिती लक्षात घेऊन बोर्डाने दुसऱ्या सत्राची बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. CBSE ची दहावी बारावीची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर 2021 घेण्यात आली होती.

CBSE ची ही सूचना टर्म 2 च्या परीक्षेच्या 50% उर्वरित अभ्यासक्रमासाठी आहे. सीबीएसईने सांगितलं की, प्रश्नपत्रिकेत ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव असे दोन्ही प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तासांचा वेळ दिला जाईल.

CBSE टर्म 1 निकाल 2022 (CBSE Term 1 Result 2022) देखील लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. इयत्ता 10वी, 12वीचा निकाल अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर घोषित केला जाईल.  इयत्ता 10, 12 वीचा अंतिम निकाल टर्म 2 च्या परीक्षांनंतर जाहीर होईल.