नवी दिल्ली : प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची सुवरण संधी मिळावी. त्यामुळे केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्यांचे स्वप्न पूर्ण होवू शकतं. CBI रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहेत. याभरतीअंतर्गत सल्लागार पदांच्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार १५ जुलैपर्यंत अर्ज भरू शकतात.
न्यायालयात सुरू असलेल्या प्रकणांच्या तपासासाठी नवे उमेदवार नियुक्त करण्याचा निर्णय CBI घेतला आहे. या भरती प्रक्रियेमध्ये निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर किंवा त्यावरील अधिकारी अर्ज दाखल करू शकतात. उमेदवाराची निवड झाल्यानंतर या पदासासाठी ४० हजार रूपयांचा पगार दिला जाणार असल्याचं CBIचे स्पष्ट केले आहे.
शिवाय, या पदावर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे केंद्र किंवा राज्य दलामध्ये १० वर्ष तपासाचा अनुभव असल्याची अट CBI कडून ठेवण्यात आली आहे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असला पाहिजे.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने CBIच्या अधिकृत वेबसाईट www.cbi.gov.inवर जाऊन अर्ज करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे नोकरी स्वीकारल्यानंतर उमेदवाराला कोणत्याही ठिकाणी पार्ट टाईम जॉब करता येणार नाही. कामाचे ठिकाण हैदराबाद असणार आहे.