बँकेत नोकरीची संधी, तीन हजार पदांसाठी बंपर भरती, पगार किती? वाचा सर्व काही

CBI Apprentice Recruitment 2024: तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बंपर भरती काढली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 22, 2024, 03:31 PM IST
बँकेत नोकरीची संधी, तीन हजार पदांसाठी बंपर भरती, पगार किती? वाचा सर्व काही title=
CBI Apprentice Recruitment 2024 vacancy for apprentice posts in Central Bank of India who can apply

CBI Apprentice Recruitment 2024: बँकिग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधताय. तर तुमच्यासाठी नोकरीची संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (CBI) अप्रेंटिसशिपसाठी 3000 पदासाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. अप्रेंटिसशिपपदासाठी अर्ज करताना नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS)च्या अधिकृत वेबसाइटवर  nats.education.gov.in जाऊन अर्ज करु शकता. 

CBI Recruitment 2024 कोण करु शकतं अर्ज

या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा संस्थेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. तसंच, उमेदवाराचा जन्म 11 एप्रिल 1996च्या आधी आणि 31 मार्च 2004 नंतर झालेला नसावा. अर्ज करताना उमेदवारांना NATS च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता. लक्षात घ्या की, फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करु शकता. 

अर्ज करतानाच काही ठराविक रक्कम भरावी लागते. रक्कम भरल्यानंतरच तुमचा फॉर्म स्वीकारला जातो. अर्जाची रक्कम जनरल, ओबीसी वर्गासाठी 800 रुपये तर, एससी, एसटी ईडब्लूएस वर्गासाठी 600 रुपये आणी पीएच उमेदवारांसाठी 400 रुपये व सर्व उमेदवारांसाठी 600 रुपये इतके अर्जाचे शुल्क भरावे लागणार आहे. 

येथे करा अर्ज

Central Bank of India Apprentice Recruitment 2024: उमेदवारांना किती पगार मिळणार?

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी तुम्ही एकदा अर्ज केल्यानंतर एक परीक्षादेखील घेण्यात येईल. उमेदवारांना ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. या उमेदवारांसाठी 15,000 रुपये मासिक पगार मिळणार आहेत.  भरतीसंदर्भात पुढील सविस्तर माहितीसाठी उमेदवार ऑफिशियल वेबसाइटवर अधिक माहिती मिळू शकेल.

भरतीची अधिकृत सूचना वाचा

किती जागा रिक्त

Central Bank of India Apprentice Recruitment साठी तीन हजार जागांसाठी ही भरती काढण्यात येत आहे. तर, या उमेदवारांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी असणार आहे. अर्ज करण्याची तारीख 21 फेब्रुवारी 2024 ते 06 मार्च 2024 पर्यंतच असणार आहे.