सरकारच्या 'या' निर्देशानंतर एटीएममध्ये २४ तास कॅश मिळणं होणार अवघड

.८ फेब्रुवारी २०१९ पासून हे निर्देश लागू होणार आहेत.

Updated: Aug 19, 2018, 05:35 PM IST
सरकारच्या 'या' निर्देशानंतर एटीएममध्ये २४ तास  कॅश मिळणं होणार अवघड title=

नवी दिल्ली : आगामी वर्षापासून शहरातील कोणत्याही एटीएममध्ये रात्री ९ नंतर तर ग्रामीण भागातील एटीएमममध्ये ६ नंतर कॅश भरली जाणार नसल्याचे सांगण्यात येतंय. गृह मंत्रालयाने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. कॅश नेणारे वाहन आणि त्यासोबत दोन शस्त्रधारी गार्ड असणार आहेत.८ फेब्रुवारी २०१९ पासून हे निर्देश लागू होणार आहेत. सातत्याने समोर येणाऱ्या कॅश व्हॅन, कॅश वॉल्ट आणि एटीएम लूटप्रकरणांनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.

नक्षली विभागातील एटीएममध्ये संध्याकाळी चार वाजल्यानंतर कॅश टाकली जाणार नाही. तिथे लक्ष ठेवणाऱ्या खासगी एजंसी बॅंकेच्या जेवणाच्या वेळेआधी कॅश भरतील. देशातील खासगी क्षेत्रात एटीएममध्ये कॅश पोहोचविणाऱ्या साधारण ८ हजार कॅश व्हॅन आहेत. या कॅश व्हॅनमधून रोज साधारण १५ हजार कोटी रूपयांची कॅश वाहतूक केली जाते. अनेकदा खासगी एजंसी पूर्ण रात्र ही कॅश वॉल्टमध्ये बाळगते.

काय आहेत निर्देश ? 

कोणत्याही कॅश व्हॅनमधून ५ कोटींपेक्षा जास्त रक्कम नेऊ नये 

प्रत्येक कॅश व्हॅनमध्ये टीपीएस उपकरण असावं. 

खासगी सुरक्षा एजंसीने कर्मचारी नेमताना त्याचा पोलीस रेकॉर्ड, आधार, राहण्याचा पत्ता याची पडताळणी करावी. 

प्रत्येक कॅश बॉक्सला वेगवेगळ्या चैनीने बांधावे. या टाळ्याची चावी वेगवेगळ्या संरक्षक एटीएम अधिकाऱ्यांकडे असावी. 

एक सुरक्षा अलार्म असावा. ज्यामध्ये ऑटो डायलर तसेच सायरन सुविधा असावी.

हल्ल्याच्या स्थितीत कारवाई करण्यासाठी कॅश व्हॅनमध्ये हूटर, आग विझविण्याचे यंत्र आणि एमरजंसी लाईट असावी.