'चौकीदार चोर' म्हटल्याप्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा दाखल

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

ANI | Updated: Apr 27, 2019, 10:31 PM IST
'चौकीदार चोर' म्हटल्याप्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा दाखल title=

पाटणा : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहुल गांधी जाहीर सभेत चौकीदार चोर आहे, असे म्हटले होते. चौकीदार चोर म्हटल्याने समस्तीपुरच्या सत्र न्यायालयात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारमधील समस्तीपुरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर आहे, अशी घोषणा दिली होती. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समस्तीपूरमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी चौकीदार चोर आहे, अशा घोषणा दिल्या. यावेळी राजदचे नेते तेजस्वी यादवही उपस्थित होते. त्यामुळे दोघेही अडचणीत आले आहेत.

दरम्यान, दुसरीकडे पाटणा न्यायालयाने राहुल गांधी यांना २० मे पूर्वी हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी हे समन्स बजावले आहेत.