डेबिड कार्डशिवाय ATMमधून पैसे काढता येणार; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

जाणून घ्या कसे काढाल पैसे...

Updated: Aug 17, 2020, 04:36 PM IST
डेबिड कार्डशिवाय ATMमधून पैसे काढता येणार; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : एटीएममध्ये गेल्यानंतर डेबिड कार्ड नसेल तरीही आता कॅश काढता येणार आहे. बँकांनी एटीएममध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. SBI, Bank of Baroda आणि ICICI Bankने ही सुविधा सुरु केली आहे. बँकेकडून ही सुविधा सुरु केली असली तरी याबाबत अनेकांना माहिती नाही. डेबिड कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढणं सोपं आणि सुरक्षितही आहे.

कसे काढाल पैसे -

- सर्वात आधी तुमची बँक डेबिड कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देते की नाही हे तपासा.
- जर बँक सुविधा देत असेल तर त्याचं ऍप डाऊनलोड करा.
- तुम्ही SBI ग्राहक असल्यास YONO ऍप डाऊनलोड करा.
- ‘YONO cash option’मध्ये जा, त्यानंतर ‘cash on mobile’पर्यायावर क्लिक करा.
- Bank of Barodaचे ग्राहक असल्यास BOB MConnect plus ऍप डाऊनलोड करा.
- त्यानंतर ‘card-less cash withdrawal’वर क्लिक करा
- ICICI Bank बँकचे ग्राहक असल्यास iMobile ऍप डाऊनलोड करा.
- त्यानंतर‘card-less cash withdrawal’वर क्लिक करा
- त्यानंतर जितकी रक्कम काढायची आहे ती टाईप करा. 
- ट्रान्झक्शन OK करा आणि नंतर बँकिंग ऍपचा PIN टाका
- बँकेकडून एक OTP रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल, हा OTP काही वेळासाठीच असेल.
- त्यानंतर आपल्या बँकेच्या ATM मध्ये ‘card-less cash withdrawal' पर्याय निवडा.
- मोबाईल नंबर टाका, रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला OTP टाका.
- त्यानंतर तिच रक्कम टाका जी मोबाईल ऍपमध्ये टाकली आहे. त्यानंतर ट्रान्झक्शन पूर्ण होईल.

केवळ १० मिनिटांत असं मिळवा इन्स्टंट पॅन कार्ड

कार्डलेस ATMचा वापर करताना डेबिड कार्डची गरज नाही. या सुविधेमुळे ATM फ्रॉड, ATM क्लोनिंगचा धोका कमी होऊ शकतो. कार्डलेस कॅशची सुविधा केवळ तुमच्याच बॅकेच्या ATMवर मिळेल. दुसऱ्या बँकेच्या ATMमधून ही सुविधा घेता येणार नाही.