CA Result 2024: सीए फायनल आणि इंटर नोव्हेंबर 2023 चा निकाल जाहीर

CA Result 2024: चार्टर्ड अकाउंटंट्स अंतिम आणि इंटरमीडिएट नोव्हेंबर 2023 परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. 

Updated: Jan 9, 2024, 12:06 PM IST
CA Result 2024: सीए फायनल आणि इंटर नोव्हेंबर 2023 चा निकाल जाहीर title=

CA Result 2024 : चार्टर्ड अकाउंटंट्स अंतिम आणि इंटरमीडिएट नोव्हेंबर 2023 परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जाऊन आपला निकाल तपासता येणार आहे. बातमीमध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन विद्यार्थी आपला निकाल तपासू शकतात. तसेच  अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यासाठी लिंकवरून विद्यार्थी त्यांची मार्कशीट डाउनलोड करू शकतील. ICAI कडून टॉपर्सची नावेही जाहीर करण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक टाकणे आवश्यक आहे. 

ICAI द्वारे घेण्यात आलेल्या सीए इंटर आणि सीए फायनल नोव्हेंबर 2023 च्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांचा निकाल आणि पेपरनिहाय गुण जाणून घेण्यासाठी ऑनलाइन मार्कशीट डाउनलोड करू शकतील. यासाठी उमेदवारांना icai.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, तुम्हाला या पोर्टलच्या होम पेजवर पॉप अप होणाऱ्या नोव्हेंबर 2023 सीए फायनल / इंटर रिझल्ट 2024 लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक भरून ते सबमिट करून निकाल पाहता येणार आहेत.

CA निकाल 2024: टॉपर्सची नावे 

सीए फायनल आणि इंटर नोव्हेंबर 2023 च्या निकालांच्या घोषणेबरोबरच, ICAI या परीक्षांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची (टॉपर्स) यादी देखील प्रसिद्ध करेल. शेवटच्या सत्राबद्दल म्हणजे मे 2023 च्या परीक्षेमध्ये अहमदाबादच्या अक्षय रमेशने 800 पैकी 616 (77 टक्के) गुण मिळवून अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावले होते. यानंतर चेन्नईचा कल्पेश जैन 603 (75.38 टक्के) गुणांसह दुसरा तर नवी दिल्लीचा प्रखर वार्ष्णे 574 (71.75टक्के) गुणांसह तिसरा आला.

दुसरीकडे, इंटरमिजिएट परीक्षेत हैदराबादच्या वाय गोकुळ साई श्रीकरने 800 पैकी 688 (86 टक्के) गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. यानंतर पतियाळा येथील नूर सिंगला 682 (85.25 टक्के) गुणांसह द्वितीय तर मुंबईची काव्या संदीप कोठारी 678 (84.75 टक्के) गुणांसह तृतीय आली होती.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा