देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी

 हा अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा असल्याचा पंतप्रधानांना विश्वास

Updated: Feb 1, 2020, 05:16 PM IST
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी  title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच साल २०२० साठीचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचे नुकतेच विश्लेषण केले आहे. हा अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.  या अर्थसंकल्पातून रोजगार निर्मिती तसेच स्किल डेव्हलपमेंटवर अधिक भर देण्यात आल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पाचे कौतुक करत त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. 

निर्यात वाढवण्यासाठी नव्या घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आला. तसेच धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करतोय असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. हा अर्थसंकल्प नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देणारा असेल असेही ते म्हणाले.

नोकरदार वर्गाला दिलासा 

पूर्वी अडीच लाख ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍या लोकांना पाच टक्के कर भरायचा होता. सरकारने आता हा कर हटवला आहे. आता ० ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याचबरोबर ५ लाख ते ७.५ पर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना आतापर्यंत २० टक्के कर भरावा लागला. आता ते १० टक्के करण्यात आला आहे.

यंदा पाच ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्या करदात्यांच्या प्राप्तिकरात कपात केली आहे. त्यानुसार ५ लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न कायम असून ५ ते ७.५ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांवर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांवर २० टक्के कर आकारला जाणार आहे. मागील वर्षी ५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १० ते १५ लाखांवर ३० टक्के होता.