नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२०२-२१ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी आतापर्यंत निम्न वर्गातील सर्वांना मोठा दिलासा दिला आहे. निम्न वर्गाला करात मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहावा या दृष्टीने सरकारने कर रचनेत बदल करून साडेसात ते दहा लाख उत्पनावर १५ टक्के कर आकारला जाणार आहे.
पूर्वी अडीच लाख ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या लोकांना पाच टक्के कर भरायचा होता. सरकारने आता हा कर हटवला आहे. आता ० ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याचबरोबर ५ लाख ते ७.५ पर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना आतापर्यंत २० टक्के कर भरावा लागला. आता ते १० टक्के करण्यात आला आहे.
यंदा पाच ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्या करदात्यांच्या प्राप्तिकरात कपात केली आहे. त्यानुसार ५ लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न कायम असून ५ ते ७.५ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांवर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांवर २० टक्के कर आकारला जाणार आहे. मागील वर्षी ५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १० ते १५ लाखांवर ३० टक्के होता.
याशिवाय ७.५ लाख ते १० लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या लोकांना १५ टक्के कर भरावा लागेल. जे यापूर्वी २० टक्के होता. त्याचवेळी १० लाख ते १२.५ पर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांवर ३० टक्के कर लागू करण्यात आला होता. तो आता २० टक्के झाला आहे.
- २.५ लाख - ५ लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के कर घटवून तो ० टक्के केला आहे.
- ५ लाख - ७.५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्क्यांवरुन तो १० टक्के कमी करण्यात आला आहे.
- ७.५ लाख - १० लाख उत्पन्न असलेल्यांना आता २० ऐवजी १५ टक्के असणार आहे.
- १० ते १२,५० लाख उत्पन्न असणाऱ्यांचा कर ३० टक्क्यांवरुन २० टक्के कमी केला आहे.
-१२.५ ते १५ लाखांच्या उत्पन्नावरील कर ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत कमी
-१५ लाखांवरील उत्पन्नावर कोणत्याही सूटशिवाय ३० टक्के कर भरावा लागेल.