Budget 2018: 1200 रूपयांहून जास्त स्वस्त होणार सोनं

तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर थोडे थांबा ... कारण अर्थसंकल्पानंतर सोनं थोडं स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या 31,000

Updated: Feb 1, 2018, 11:10 AM IST
Budget 2018: 1200 रूपयांहून जास्त स्वस्त होणार सोनं   title=

  मुंबई  : तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर थोडे थांबा ... कारण अर्थसंकल्पानंतर सोनं थोडं स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या 31,000
च्या आसपास सोन्याचे भाव आहेत. 

अरूण जेटली सोन्यावर लागणारी इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची शक्यता असल्याने  इंडियन बुलियन ज्वैलर्स एसोसिएशन (IBJA)ला सोन्याचे भाव कमी होण्याची आशा आहे. यामुळे सुमारे 600 ते 1200 रूपयांनी सोन्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे. 

 

इंपोर्ट ड्युटी कमी होणार   

 

इंडियन बुलियन ज्वैलर्स एसोसिएशन (IBJA)ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, इंम्पोर्ट ड्युटीमध्ये 2-4% घट होण्याची शक्यता आहे. असोसिएशनने सुमारे 6% कमी करण्याची मागणी केली आहे. सध्या सोन्यावर 10% इम्पोर्ट ड्युटी आहे. 

 
दर घसरणार आहे 

भारतामध्ये सध्या 10 ग्राम सोन्यासाठी 31000 रूपये द्यावे लागतात. जर इम्पोर्ट ड्युटी 1% कमी झाली तरीही 10 ग्राम साठी 300 रूपयांचा फायदा मिळणार आहे.  

1200 रूपयांनी स्वस्त होणार   

अर्थमंत्री 2-4 % घट करणार असतील तर 600 ते 1200 रूपयांचा फायदा होणार आहे. इंम्पोर्ट ड्युटीमुळे देशात सोन्याची तस्करी वाढली आहे. इम्पोर्ट ड्युटी कमी झाल्यास एक्स्पोर्टलाही चालना मिळणार आहे.