पंतप्रधानांच्या नावापुढे 'श्री' न लावल्याने BSF जवानाचा पगार कापला

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढे 'श्री' न लावणे बीएसएफ जवानाला महागात पडले. पंतप्रधानांच्या नावाआधी 'श्री'चा उल्लेख न केल्याने त्याचा पगार कापण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन सारवासारव करण्यात आली. लल्लन टॉप वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Updated: Mar 9, 2018, 07:56 AM IST
 पंतप्रधानांच्या नावापुढे 'श्री' न लावल्याने BSF जवानाचा पगार कापला  title=

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढे 'श्री' न लावणे बीएसएफ जवानाला महागात पडले. पंतप्रधानांच्या नावाआधी 'श्री'चा उल्लेख न केल्याने त्याचा पगार कापण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन सारवासारव करण्यात आली. लल्लन टॉप वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

जवानावर कारवाई ?

एखाद्याच्या नावापुढे आदराने श्री लावणं इतपत सर्व ठिक आहे. पण 'श्री' चा उल्लेख न केल्याने एका आठवड्याचा पगार कापण हे विचित्र होतं.

त्यातही एखाद्या बीएफएफ जवानासोबत हे होत असेल तर काय म्हणणार ? हे प्रकरण माध्यमांधून बाहेर आल्यानंतर यावर सारवासारव करण्यात आली. 

कार्यवाही  

पंतप्रधानांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यानंतर जवानाला त्याचा कापलेला पगार देण्यात आला. या कार्यवाही संदर्भात ट्वीटही करण्यात आलयं.