पुलवामा हल्ला: सुट्ट्या सोडून लगेच परतले जखमी ब्रिगेडियर हरबीर सिंह

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यसाठी सुट्ट्या मध्येच सोडून आले ब्रिगेडियर हरबीर सिंह

Updated: Feb 20, 2019, 09:41 AM IST
पुलवामा हल्ला: सुट्ट्या सोडून लगेच परतले जखमी ब्रिगेडियर हरबीर सिंह title=

श्रीनगर : भारतीय जवानांचा जोश आणि देशप्रेम यांचे कितीतरी उदाहरणं आज जगासमोर आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर याचं आणखी एक उदाहरण समोर आलं जेव्हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी बिग्रेडियर हरबीर सिंह आपल्या सुट्ट्या मध्येच सोडून पुन्हा कामावर आले. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. लष्कराचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी म्हटलं की, 'जखमी झालेले बिग्रेडियर हरबीर सिंह सुट्टीवर होते. पण जेव्हा त्यांना पुलवामा हल्ल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच दहशतवाद्यांच्या सर्च ऑपरेशनसाठी त्यांनी आपल्या सुट्ट्या रद्द करुन सेवेसाठी हजर झाले. पुलवामा हल्ल्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशनमध्ये जैशच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथील हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

ढिल्लन यांनी म्हटलं की, ' ब्रिगेडियर सिंह काश्मीरला परत आले आणि थेट ऑपरेशन सुरु होतं तेथे पोहोचले. यानंतर त्यांनी या ऑपरेशनचं नेतृत्व केलं. डीआयजी अमित कुमार यांनी देखील या कारवाईचं नेतृत्व केलं. यादरम्यान ते जखमी झाले. लष्कराचे जवान अशाच प्रकारे भविष्यात होणाऱ्या कारवाईचे नेतृत्व करत राहतील. सोमवारी पुलवामामध्ये झालेल्या कारवाईत लष्कराचे 3 जवान शहीद झाले होते. या कारवाईत डीआयजी कुमार, ब्रिगेडियर सिंह, एक लेफि्टनेंट कर्नल आणि एक कॅप्टन देखील जखमी झाले होते.'