अरेरे, ट्रेलरच इतका वाईट तर पिक्चक कसा असेल ! लग्नाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी...

या व्हिडीओत कोणी डान्स करत नाही तर वधू-वराशी संबंधित आहे. Bride Groom Video नक्की काय झालं की वधू-वरात जुंपली... पाहा व्हिडीओ

Updated: Jan 12, 2023, 07:21 PM IST
अरेरे, ट्रेलरच इतका वाईट तर पिक्चक कसा असेल ! लग्नाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी... title=

Bride Groom Fight Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी हे व्हिडीओ खूप विनोदी असतात तर कधी पाहून प्रत्येक व्यक्तीला अश्रू अनावर होतील असे. तर कधी हे व्हिडीओ कोणत्या कार्यक्रमातील असतील तर कधी लग्नातील... दरम्यान, लग्नातील तर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. सध्या लग्नातील असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कोणी डान्स करत नाही तर वधू-वराशी संबंधित आहे. मात्र, व्हिडीओत जे काही दिसत आहे ते पाहून कोणाला हसू अनावर होईल. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत वधू-वर हे स्टेजवर आहेत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी पाहुणे स्टेजवर येताना दिसत आहेत. या दरम्यानच, वधू-वरात कोणत्या तरी गोष्टीवरून वाद होतो आणि तो वाद इतका वाढतो की दोघेही लग्नाच्या खुर्चीवरून उठतात आणि एकमेकांवर ओरडू लागतात. थोड्याच वेळा हे भांडण वाढत आणि ते चप्पल काढून एकमेकांना मारू लागतात. खरंतर याची सुरुवात तो नवरदेव करतो आणि मग काय ती वधू काय थांबायचं नाव घेत नाही. तिनं देखील तिची सॅन्डल काढली. यामुळेच आनंदात सुरु असलेल्या या लग्न सोहळ्यात काही क्षणांमध्येच सगळा गोंधळ सुरु होतो. त्यानंतर हा लग्न मंडप कमी आणि कुस्तीचे मैदान असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्या दोघांना तिथे उपस्थित असलेले लोक कसे बसे शांत करतात. 

हेही वाचा : बच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ kashyap_memer या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत हा कुठल्या ठिकाणचा व्हिडीओ आहे किंवा कधीचा आहे असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत जेव्हा 36 चे 36 गुण जुळतात तेव्हा असं होतं अशी कमेंट केली आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, नक्की हे लग्नच आहे ना की युद्धभूमी आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, पहिल्यांदा मला लग्न पाहून आनंद झाला आहे.