आता लाच देणाऱ्यालाही तुरुंगवासाची शिक्षा

सावधान ! आता लाच दिली तर जावं लागणार तुरुंगात

Updated: Aug 1, 2018, 08:43 AM IST
आता लाच देणाऱ्यालाही तुरुंगवासाची शिक्षा title=

मुंबई : आतापर्यंत लाच घेणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात जावं लागत होतं पण आता लाच देणाऱ्यालाही तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारणा कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. या नव्या लाचविरोधी कायद्यानुसार लाच देणाऱ्या व्यक्तीला आता जास्तीत जास्त सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

कायद्यातील या सुधारणेनुसार शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. यात लाच देणाऱ्याला त्याची बाजू मांडण्याची देखील संधी देण्यात आली आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचा 2 वर्षांत निकाल लावण्याची तरतुदही या विधेयकात करण्यात आली होती.

नव्या कायद्याप्रमाणे दोषी आढळलेल्याला मूळ कायद्यात कमीतकमी ६ महिन्यांची शिक्षा होती. आता ती ३ वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. एवढेच नाही तर दंडासह ती ७ वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते. तसेच पुन्हा असाच गुन्हा करणाऱ्याला कमीतकमी ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. ही शिक्षादेखील दंडासह १० वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते.