Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, WhatsApp वर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक प्रकार समोर!

Crime News : अश्लिल फोटो व्हिडिओ (Obscene Photo) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची 85 हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी हिसकावल्याची तक्रार दाखल केली आहे. 

Updated: May 15, 2023, 01:23 AM IST
Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, WhatsApp वर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक प्रकार समोर! title=
Crime News

Obscene Photo of Woman: क्लॉक टॉवर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, एका तरुणीशी इंस्टाग्रामवर (Instagram) मैत्री करून अश्लील फोटो आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल (blackmailing) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्लिल फोटो व्हिडिओ (Obscene Photo) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची 85 हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी हिसकावल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. क्लॉक टॉवर स्टेशनचे प्रभारी महावीर शर्मा यांनी याविषयीवरून माहिती दिली आहे.

इन्स्टाग्राम आयडीवर एका तरुणाशी संपर्क साधल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. प्रेमानं बोलून तरुणाने  तिचा मोबाईल क्रमांक घेऊन व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केली. यादरम्यान तिला प्रपोज करून विनयभंग केला. व्हिडिओ कॉल दरम्यान तिचे कपडे काढण्यास भाग पाडलं आणि आरोपी तरुणाने तिच्या व्हिडिओ कॉलचे अश्लील स्क्रीनशॉट्स काढले. त्यानंतर काही दिवसांनी तिच्याकडून पैश्यांची मागणी केली.

आईची तब्येत बिघडली होती, त्यासाठी पैसे गोळा केले होते, ते पैसे आरोपीने घेतल्याचं पिडीतेने पोलिसांना सांगितलं आहे. एके दिवशी आरोपी तरुण ती घरात एकटी असताना आला आणि तिचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सुमारे 85 हजार रुपये लंपास केले. त्याचबरोबर सोन्याची अंगठी घेऊन गेला. तिच्यासोबत अश्लील कृत्यही करण्यात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

आणखी वाचा - Crime News : सासू-सासरे, सिम अन् सेक्स चॅट; दुहेरी हत्याकांडचं गूढ अखरे उकलेलं...

दरम्यान आरोपीने व्हिडिओ फोटो व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी दिली.​ तरुणीला हॉटेलमध्ये बोलावलं. धमक्यांमुळे व्यथित होऊन पीडितेने बळजबरीने हॉटेल गाठलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली. आरोपीच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून पीडितेने तिचा फोन बंद केला. काही वेळानंतर पीडितेने घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर पीडितेने क्लॉक टॉवर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.