भाजप आमदार लोकेंद्र सिंह यांचा कार अपघातात मृत्यू

भाजपचे आमदार लोकेंद्र सिंह यांचा एका अपघातात मृत्यू झाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 21, 2018, 08:37 AM IST
भाजप आमदार लोकेंद्र सिंह यांचा कार अपघातात मृत्यू title=

नवी दिल्ली : भाजपचे आमदार लोकेंद्र सिंह यांचा एका अपघातात मृत्यू झाला आहे.

बिजनौरच्या नूरपूरमधून भाजपमधून निवडून आलेले आमदार लोकेंद्र सिंह यांचा बुधवारी सीतापूर येथे अपघातात मृत्यू झाला. या घटनेत दोन सुरक्षा रक्षक आणि ड्राईव्हर यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे.

कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात या तिघांचा मृत्यू झाला आहे.