अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक

अमित शाहंसोबत निवडणुकीबाबत चर्चा, भाजप उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब?

Updated: Sep 26, 2019, 11:53 AM IST
अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक title=

नवी दिल्ली : राज्यातील भाजप कोअर कमिटीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे मुंबईतून दिल्लीला रवाना झाले आहेत. बैठकीत निवडणूक रणनितीबाबत चर्चा होणार आहे.

बैठकीत महाराष्ट्राच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार आहे. भाजपाच्या पहिल्या यादीवर, उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्य वर्तवण्यात आहे. तसेच बैठकीत शिवसेनेसोबत युती संदर्भात, जागा वाटपाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्याही दिल्लीत आज बैठका होणार आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची, तसेच छाननी समितीचीही बैठक आहे. आज काँग्रेसचीही दुसरी यादी येण्याची शक्यता आहे.