नवी दिल्ली : भारतीय नौसेना आज (४ डिसेंबर) भारतीय नौसेना दिवस साजरा करत आहे. यानिमित्तानंच दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपल्या मनातलं देशप्रेमही सोशल मीडियावर व्यक्त केलं... मात्र, सोशल मीडियावर ते ट्रोलर्सच्या निशाण्यावरही आले... त्याचं झालं असं की भोजपुरी अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी यांनी भारतीय नौदलाला शुभेच्छा देताना एक फोटो शेअर केला. या फोटोत अमेरिकेच्या नौदलातील जहाजासहीत अमेरिकेचा झेंडाही स्पष्ट दिसतोय. अर्थात सोशल मीडियाच्या तीष्ण नजरेतूनही हा फोटो काही सुटला नाही.
अत्यंत साहस और निष्ठा भाव से राष्ट्र सेवा की सुरक्षा में समर्पित सभी भारतीय नौ सैनिकों को नौ सेना दिवस की हार्दिक शुभकामनाएं। pic.twitter.com/FXo5fjHaZg
— Manoj Tiwari (@ManojTiwariMP) December 4, 2019
'अत्यंत साहस आणि निष्ठा भावानं राष्ट्र सेवेच्या सुरक्षेत समर्पित सर्व भारतीय नौसेनिकांना नौसेना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' असं मनोज तिवारी यांनी ट्विट केलं. यावेळी त्यांनी अमेरिकेचा झेंडा फडकत असलेल्या जहाजाचा फोटो वापरला. या फोटोवर मनोज तिवारी यांच्यासहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांचाही फोटो एडिट करून लावण्यात आलाय. हे लक्षात आल्यानंतर सोशल मीडिया त्यावर रिऍक्ट तर होणारच ना... मग काय... सोशल मीडियावर लोकांनी मनोज तिवारी यांना चांगलंच धारेवर धरलं.
भारतीय झंडे और संविधान की कितनी इज़्ज़त करते है सबको पता है।
वैसे इन अज्ञानियों को पता ही नही होगा नौसेना क्या होती है और सेना क्या होती है।
— Balram Singh (@Bro_Balram) December 4, 2019
कस होणार या भाजप वाल्यांच पाठीमागे पहा अमेरिकेचा झेंडा आहे
— AJAY PATIL (@ajaypatilspeaks) December 4, 2019
New Pirates of Carribian
Rinkiya ke papa pic.twitter.com/SLH5oNfMox— Mahatma Gandhi Sena (@dildar12) December 4, 2019
त्यानंतर, मात्र मनोज तिवारी यांना या फोटोवर स्पष्टीकरण द्यावं लागलं. 'अमेरिका आणि भारतीय नौदलाच्या संयुक्त अभ्यासादरम्यानचा हा फोटो असून तो 'Indian Rakshak'च्या वेबसाईटवरून घेण्यात आला आहे' असं त्यांनी स्पष्ट केलं.
बरछी भाला लेकर जुटे मित्रों ये भारतीय नौसेना और अमेरिकी नौसेना के संयुक्त अभ्यास का चित्र है जो indian rakshak की website से ली गई है.. शरमाने की आवश्यकता नहीं है हो जाता है.. पर मेरे #sonimishra वाले ट्वीट पर भी कुछ विचार दें https://t.co/e5Nnlf3126
— Manoj Tiwari (@ManojTiwariMP) December 4, 2019
४ डिसेंबर १९७१ रोजी भारत - पाकिस्तान युद्धादरम्यान कराची बंदरावरील धाडसी हल्ल्याच्या स्मरणार्थ 'भारतीय नौदल दिन' साजरा केला जातो.