2021 मध्ये दर मिनिटाला सर्वात जास्त ऑर्डर झालेला पदार्थ, तुम्ही कधी खाल्लाय का?

हा पदार्थ काही नवा नाही.  

Updated: Dec 22, 2021, 05:38 PM IST
2021 मध्ये दर मिनिटाला सर्वात जास्त ऑर्डर झालेला पदार्थ, तुम्ही कधी खाल्लाय का?  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

मुंबई : खाण्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्यांच्या आवडीनिवडी अनेकदा इतक्या रंजक असतात, की ते पाहून पाहणाऱाही अवाक् होतो. अशा मंडळींसाठी बिर्याणी हा पदार्थ काही नवा नाही.

आता इथं बिर्याणीचंच नाव घेण्याचं कारण म्हणजे, या पदार्थावर खवैय्यांनी व्यक्त केलेलं प्रेम. 

स्विगी या ऑनलाईन फूड डिलीवरी अॅपनं वार्षिक माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये बिर्याणीवर भारतीयांनी भागवलेल्या भुकेचा सहज अंदाज लावता येत आहे. 

2021 च्या वार्षिक अहवालानुसार वर्षभरात अंदाजे प्रत्येक मिनिटाला 115 बिर्याणीच्या ऑर्डर करण्यात आल्या आहेत. 

ही आकडेवारी पाहता दर सेकंदाला प्रत्येकी दोनदा बिर्याणीची ऑर्डर दिली गेल्याचं सांगण्यात आलं आहे. 

स्नॅक्सबाबत सांगावं तर, समोसा या पदार्थाला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. 

हाती आलेल्या आकडेवारीनुसार या अॅपच्या माध्य़मातून न्यूझीलंडच्या लोकसंख्येइतके समोसे लोकांनी ऑर्डर केले आहेत. 

पण, बिर्याणीला हा पदार्थ मागे टाकू शकलेला नाही. सलग सहाव्या वर्षी प्राधान्यानं खाल्ल्या गेलेल्या पदार्थांमध्ये बिर्याणीनं बाजी मारली आहे. 

विविध शहरांच्या आकडेवारीनुसार चेन्नई, हैदराबाद, लखनऊ आणि कोलकाता इथं चिकन बिर्याणी सर्वाधिक प्रमाणात ऑर्डर करण्यात आली आहे. 

तर, बंगळुरूमध्ये ही दुसरा आवडीचा पदार्थ ठरला आहे. 

व्हेज आणि चिकन बिर्याणीची स्पर्धा, अव्वल कोण? 
चिकन बिर्याणीप्रमाणंच व्हेज बिर्याणी ऑर्डर करणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. पण, व्हेजच्या तुलनेत चिकन बिर्याणी तब्बल चार पट जास्त वेळा ऑर्डर केली आहे. 

दरम्यान, काहीतरी वेगळं खाण्याच्या नादात यंदाच्या वर्षी लोकांनी एनोकी मशरूम (Enoki Mushrooms) या पदार्थाला अनेकदा सर्च केलं आहे. 

आपण कायमच खाण्याच्या पदार्थांबाबत बोलतो, त्यांची चवही चाखून पाहतो. पण, कधी ही आकडेवारी पाहून हा विचार तुम्ही केलाय का, की ऑर्डर करणाऱ्यांपैकीच एक आपणही होतो?