पटना : बिहारमधून एक आश्चर्यकारक वृत्त समोर येतंय. एका शाळेने दिलेल्या ट्रान्सफर सर्टीफिकेटनुसार (Three Day Old Child Passed Class Eight) 3 दिवसाच्या मुलाने 8 वी परीक्षा पास केली आहे. ट्रान्सफर सर्टीफिकेटनुसार, विद्यार्थ्याचा जन्म 20 मार्च 2007 रोजी झाला होता. आणि 23 मार्च 2007 रोजी तो आठवीच्या वर्गात उत्तीर्ण झाला.
प्रिन्स कुमार या विद्यार्थ्याला हे ट्रान्सफर सर्टिफिकेट(3 Day Old Child Passed 8th Class) देण्यात आले.
त्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 'मी मुझफ्फरपूरच्या गोसाईदास टेंगरी सरकारी शाळेत 8 वी पास केली. शाळेने माझी जन्म तारीख (Date Of Birth) 20 मार्च 2007 रोजी टीसीमध्ये लिहिलेली आहे.
विशेष म्हणजे ही चूक न पाहता शाळेच्या मुख्याध्यापकांनीही त्यावर सही केली. जेव्हा मी या प्रकरणी शाळेत गेलो आणि मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शाळेतील लोकांनी मला शाळेच्या बाहेर काढले. यानंतर माझ्या वडिलांनी जिल्हा शिक्षणाधिकारी (DEO)यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी कारकुनाची चूक झाल्याचे कबूल केले.'
तो लिपीकाचा दोष असून आम्ही लवकरच तो दूर करू. आम्ही शाळा प्रशासनाविरूद्ध विभागीय कारवाईही सुरू केली आहे, असे मुजफ्फरपूर जिल्हा शिक्षणाधिकारी (DEO) यांनी सांगितले.
यापूर्वी मुजफ्फरपूरच्या भीमराव आंबेडकर विद्यापीठात अशीच एक चूक झाली. त्यात विद्यार्थ्याच्या प्रवेश पत्रात वडिलांचे नाव इमरान हाश्मी आणि आईचे नाव सनी लिओनी लिहिले होते.