Bihar Result 2020: आतापर्यंत 1 कोटी मतमोजणी पूर्ण, 3 कोटी बाकी

बिहारमध्ये बऱ्याच जागांवर कांटे की टक्कर...

Updated: Nov 10, 2020, 03:13 PM IST
Bihar Result 2020: आतापर्यंत 1 कोटी मतमोजणी पूर्ण, 3 कोटी बाकी title=

Bihar Election 2020: बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. एनडीए जरी सध्या पुढे असली तरी देखील अनेक जागांवर कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. 243 विधानसभा मतदारसंघाचा निकाल अजून पूर्णपणे लागलेला नाही. कारण 4 कोटी पैकी फक्त 1 कोटी मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दुपारी 2 वाजेपर्यंत एनडीए 130 तर महाआघाडी 102 जागांवर आघाडीवर आहे. 

महत्त्वाचं म्हणजे अशा अनेक जागा आहेत जेथे खूप कमी मतांचं अंतर आहे.

11 जागांवर 200 पेक्षा कमी मतांचं अंतर
23 जागांवर 500 पेक्षा कमी मतांचं अंतर
49 जागांवर 1000 पेक्षा कमी मतांचं अंतर
80 जागांवर 2000 पेक्षा कमी मतांचं अंतर
123 जागांवर 3000 पेक्षा कमी मतांचं अंतर
166 जागांवर 5000 पेक्षा कमी मतांचं अंतर

बिहार निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. आयोगाने म्हटलं की, मतमोजणी अजून सुरु आहे. आतापर्यंत 1 कोटीहून अधिक मतमोजणी झाली आहे. कोरोनामुळे बुथची संख्या वाढली आहे. सोबतच काउंटिंग बूथची संख्या वाढली आहे. उशीरा रात्रीपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच. श्रीनिवासन यांच्यामते यंदा 34 हजार पोलिंग स्टेशन वाढले आहेत. काही जागांवर 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे. तर काही ठिकाणी 51 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत फक्त 20 टक्के मतमोजणी झाली आहे. 6 ते 7 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल.'