बिहार निवडणूक निकाल : बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडीत आता कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. कारण फक्त 5 जागांचं अंतर दिसत आहे. उशिरा रात्रीपर्यंत निकाल हाती लागण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3 जागांवर 200 मतांचं अंतर, 9 जागांवर 500 मतांचं अंतर तर 17 जागांवर 1000 मतांचं अंतर आहे. तर 33 जागांवर 2000 मतांचं अंतर आहे. तर 48 जागा अशा आहेत जेथे 3000 मतांचं अंतर आहे. 68 जागांवर 5000 मतांचं अंतर आहे.
साडेसहा वाजेपर्यंत 3 कोटीहून अधिक मतमोजणी झाली आहे. अजूनी 1 कोटीहून अधिक मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे बहुमत कोणत्या पक्षाला मिळेल हे अजूनही सांगता येणं कठीण आहे.
बिहारमध्ये सहा वाजेपर्यंत एनडीए 123 जागांवर तर महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे.
नितीश कुमार यांच्या निवासस्थानी सध्या महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला भाजपने नेते सुशील कुमार मोदी आणि भूपेंद्र यादव देखील पोहोचले आहेत.