बिहार निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवाराला अटक

पोलिसांनी कोर्टात केलं हजर

Updated: Oct 17, 2020, 11:53 AM IST
बिहार निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवाराला अटक title=

मुजफ्फरपूर : सीपीआय-एमएल नेते मो आफताब यांना पोलिसांनी तेव्हा अटक केली जेव्हा ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले होते. औराई विधानसभा मतदारसंघातून त्यांना महाआघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. मो.आफताब यांच्या अटकेला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. पण पोलिसांनी त्यांना अटक करुन कोर्टात हजर केलं.

पोलिसाच्या माहितीनुसार, मो. आफताब आलम यांच्यावर सरकारी कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीवरुन त्यांना अटक करण्यात आली. मो. आफताब आलम यांचं म्हणणं आहे की, मला याबाबत काहीही माहित नाही. माझी बदनामी करण्यासाठी हे केलं जात आहे. यामध्ये विरोधकांचा हात आहे.