ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य

बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असतांना ही घोषणा करण्यात आली आहे.

shailesh musale Updated: Mar 27, 2018, 04:46 PM IST
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य title=

पटना : बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असतांना ही घोषणा करण्यात आली आहे.

बिहारमध्ये अनेक खेळाडू आहेत. येथे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी प्रोत्साहनची गरज आहे. कला संस्कृती, खेळ आणि युवा विभागाचे प्रभारी मंत्री प्रमोद कुमार यांनी याची घोषणा केली आहे की, ऑलिंम्पिकमध्ये जो ही खेळाडू सुवर्ण पदक जिंकेल त्याला २ कोटीचं बक्षीस दिलं जाईल.

राज्यात १४१ स्टेडिअम बांधण्यात आले आहेत. काहीचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. ५१ नव्या स्टेडिअमसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.