दिल्लीच्या विजयानंतर बिहार आणि महाराष्ट्र आपचं पुढील लक्ष्य

इतर राज्यातल्या निवडणुकांसाठी आपची रणनीती 

Updated: Feb 16, 2020, 11:00 AM IST
दिल्लीच्या विजयानंतर बिहार आणि महाराष्ट्र आपचं पुढील लक्ष्य  title=

मुंबई : दिल्लीच्या विजयानंतर आता आम आदमी पार्टीनं इतर राज्यातल्या निवडणुकांसाठी रणनीती आखणं सुरू केलं आहे. आगामी काळात बिहार विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांपासून झेडपी निवडणुकीत आप सहभागी होणार आहे.

भारत जिंकण्यासाठी केजरीवाल सज्ज

हा निकाल केवळ आम आदमी पार्टीच्या दुसऱ्या ऐतिहासिक विजयाचा नव्हता. ६२ जागा जिंकणं केवळ अरविंद केजरीवाल केवळ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणं नव्हतं. आपच्या विस्ताराला दिशा देणारे हे विजयाचे आकडे आहेत. आम आदमी पार्टी आता पुन्हा एकदा दिल्लीबाहेर पडून अन्य राज्यात जिंकण्याच्या इराद्यानं, अधिक मनोबल आणि आत्मविश्वासानं निवडणुकीत उतरे आहेत. त्यासाठी आपचं नवं लक्ष्य आहे बिहारची विधानसभा आणि महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिकेपासून जिल्हा परिषद निवडणूक आहे.

महाराष्ट्रात निवडणूक कुणीही लढू शकतं मात्र दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा फरक असल्याची प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून उमटते आहे.

दिल्लीनंतर आता बिहारमध्ये निवडणूक होणार आहे. बिहारच्या मैदानात उतरण्याची तयारी आम आदमी पार्टी करते आहे. 

अरविंद केजरीवालांनी दिल्ली विजयानंतर जारी केलेल्या एका ऑडिओमुळे आपच्या विस्तारावर शिक्कोमोर्तब होतं आहे.

केजरीवालांनी आपल्या संभाषणात म्हटलंय की, 'जेव्हा भारत मातेचा प्रत्येक मुलगा चांगलं शिक्षण घेईल. जेव्हा भारताच्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य लाभेल. जेव्हा सुरक्षा आणि सन्मान महिलांमध्ये आत्मविश्वास जागवेल. प्रत्येक तरुणाच्या कपाळावरून बेरोजगारीचा डाग जाईल.'

आम आदमी पार्टीनं देशभर सदस्य नोंदणी अभियानही जोरदार सुरू केलं आहे. रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधकांना निमंत्रण पाठवण्यात आलं नाही. याचाच अर्थ अरविंद केजरीवाल भाजपविरोधात स्वतंत्र लढण्याची रणनीती आखली जात आहे.