Bank Privatisation: बँक प्रायव्हटायजेशनबाबत मोठी अपडेट

लवकरच दुसऱ्या सरकारी बँकेचं खासगीकरण (bank privatisation) करण्याचे काम सुरू आहे.  

Updated: Oct 14, 2022, 11:07 PM IST
Bank Privatisation: बँक प्रायव्हटायजेशनबाबत मोठी अपडेट title=

मुंबई : बँकांच्या खाजगीकरणासाठी सरकार वेगाने काम करत आहे. लवकरच दुसऱ्या सरकारी बँकेचं खाजगीकरण (bank privatisation latest news) करण्याचे काम केलं जातय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबत माहिती दिली होती. देशाच्या बँकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार अनेक बदल करत आहे. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणासाठी (IDBI Bank privatisation) मार्चपर्यंत निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे. (big update on bank privatization this group will present eoi finance minister gave information)

श्रीराम ग्रुप आयडीबीआय बँकेच्या संभाव्य बोलीसाठी (Auction) काम करत आहे. मार्चपर्यंत निविदा (Tender) मागवण्याची शक्यता असल्याचे सरकारनं म्हटलं आहे. श्रीराम ग्रुप लवकरच यासाठी ईओआय सादर करू शकेल, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे.

श्रीराम ग्रुप हा फायनान्सर आहे, त्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. सध्या, हा समूह IDBI बँकेच्या खाजगीकरणात सहभागी होण्यासाठी स्वतंत्र होल्डिंग कंपनी स्थापन करू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 

श्रीराम ग्रुप नक्की कार करतं? 

आर त्यागराजन यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम समूह सध्या व्यावसायिक वाहन वित्तपुरवठा, दुचाकी वित्तपुरवठा तसेच लहान आणि मध्यम व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत आहे. श्रीराम समूह IDBI बँकेसाठी बोलीदार म्हणून एक व्यासपीठ तयार करू शकतो. 

2 टप्प्यात खासगीकरण 

आयडीबीआय बँकेचे 2 टप्प्यात खाजगीकरण करण्यात येणार असल्याचे सरकारनं म्हटलंय. त्यात स्वारस्य असलेल्यांकडून प्रथम ईओआय सादर केला जाईल. RBI खाजगीकरण प्रक्रियेतील सहभागींच्या पात्रतेचे मूल्यांकन केले जाईल. त्यांना नियामकाची चाचणी उत्तीर्ण करणे आणि सरकारी सुरक्षा मंजुरी मिळवणे आवश्यक असेल.