नवी दिल्ली : दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता.
सकाळी ९.४५ वाजता ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप अफगाणिस्तान - ताजिकिस्तान सीमा प्रदेशात झाला. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की दिल्ली, जम्मू काश्मीर आणि आजूबाजूचा परिसराठी या भूकंपाचे धक्के जाणवले.
दरम्यान, भूकंपामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आहे.