पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

या राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

Updated: May 30, 2018, 02:21 PM IST
पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय title=

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती सध्या मोदी सरकारची डोके दु:खी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव वाढल्याने आणि तेल कंपन्यांनी भाव वाढवल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. त्यातच यावर नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून केरळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केरळ सरकारने पेट्रोल-डिझेलवर लागणार स्टेट टॅक्स बंद केला आहे. राज्याच्या  कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण पेट्रोल-डिझेलवर किती टॅक्स कमी केला गेला आहे याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. केरळमध्ये सध्या पेट्रोलचे दर 82.61 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 75.19 रुपये प्रति लीटर आहे.

केरळच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटलं की, कॅबिनेट बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स हटवण्याच्या निर्णयावर सहमती झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे नवे दर गुरुवारपासून लागू केली जाणार आहेत.

किती आहे पेट्रोलवर राज्याचा कर

केरळमध्ये सध्या पेट्रोलवर 32.02 टक्के टॅक्स लागतो तर डिझेलवर 25.58 टक्के टॅक्स लागतो. शिवाय पेट्रोल-डिझेलवर 1 टक्के सेस देखील लागतो. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये पेट्रोल-डिझेलवरील टॅक्सपासून 7795 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले होते. जवळपास सर्व राज्यांमध्ये पेट्रोलवर 25 टक्के टॅक्स लागतो.

किती स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल

केरळमध्ये जर स्टेट टॅक्स कमी करण्यात आला तर जवळपास 20 रुपए पेट्रोल स्वस्त होऊ शकतं. त्यानंतर पेट्रोलचे दर 62 रुपये प्रति लीटर होईल. पण केरळ सरकारने अजून हे स्पष्ट केले नाही की किती टॅक्स कमी करण्यात येणार आहे.