नवी दिल्ली : देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देश संकटात आहे. याबाबत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. देशातील ऑक्सिजनची कमतरता कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पीएम केअर फंडमधून शासकीय रूग्णालयात 550 हून अधिक ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प स्थापित केले जातील.
पंतप्रधान मोदींनी पीएम केअर फंडमधून देशात 551 वैद्यकीय ऑक्सिजन तयार करणार्या प्लांटला मंजुरी दिली असल्याची माहिती पीएमओकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) माहिती दिली की पंतप्रधानांनी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या दिशानिर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या अंतर्गत 551 समर्पित वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प स्थापित करण्यासाठी पीएम केअर फंडकडून निधी वाटप करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
हे प्रकलप् लवकरात लवकर कार्यान्वित केले पाहिजे असे पंतप्रधानांनी निर्देश दिले आहेत. हे प्रकलप् विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील सरकारी रुग्णालयात स्थापित केल्या जातील. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत हे खरेदी करण्यात येणार आहे. पीएमओ पुढे नमूद करते की जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयात पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट स्थापित करण्यामागील मूलभूत हेतू सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे आणि या प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीची सुविधा असणे हे सुनिश्चित करणे आहे.
पीएमओने सांगितले की, 'कोरोना आणि इतर रुग्णांना व्यवस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अचानक व्यत्यय येऊ नये आणि पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी मदत होईल.'