ऑफिसमधील त्रासाला कंटाळून दिली बॉसची सुपारी! समोर आला मारहाणीचा धक्कादायक Video

Frustrated Worker Hire Goons To Beat Up Boss: खासगी कंपनीतील या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक घटनाक्रम एका कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 6, 2024, 03:06 PM IST
ऑफिसमधील त्रासाला कंटाळून दिली बॉसची सुपारी! समोर आला मारहाणीचा धक्कादायक Video title=
सोशल मीडियावर हा धक्कादाय व्हिडीओ समोर आला आहे

Frustrated Worker Hire Goons To Beat Up Boss: बंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील पोलिसांनी 5 जणांच्या एका टोळीला अटक केली आहे. हे पाचही जण एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण करत होते. या कर्मचाऱ्याचा जीव घेण्याचा या पाच जणांचा प्रयत्न होता. मात्र सुदैवाने सुरेश नावाची ही व्यक्ती बचावली. तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेशला ठार करण्यासाठी त्याच्याच ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी या टोळीला सुपारी दिली होती. सुरेशबरोबर काम करणाऱ्या त्याच्या टीममधील सहकारी त्यांनी दिल्या जामाऱ्या वागणूकीला फार कंटाळले होते. सुरेशला ठार मारण्यासाठी ज्यांनी सुपारी दिली ते सुरेशच्या टीममध्ये काम करतात. सुरेश कामाच्या ठिकाणी आपल्यावर फार मानसिक दबाव आणतो आणि अगदी कंपनीच्या मालकासमोर आपला पाणउतारा करतो या रागातून त्याला ठार करण्याची सुपारी दिल्याची कबुली या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

मार खाणारा आणि सुपारी देणारे कोण?

हेरिटेज मिल्क कंपनीमध्ये सुरेश ऑडिटर म्हणून कार्यरत आहे. त्याच्याबरोबर काम करणाऱ्या उमाशंकर, विनेश कामासाठी फार दबाव आणायचा. त्यामुळेच या तिघांनी अन्य दोघांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला. रस्त्याच्या बाजूला सुरेशला मारहाण करण्यात आली. सुरेशला झालेली मारहाण एका कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सुरेशला रस्त्यावर पाडून दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. लोखंडी दांड्याने त्याच्यावर अनेकदा हल्ला करण्यात आला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सदर घटनेची दखल घेतली. सोशल मीडियावरील अनेकांनी बंगळुरु पोलिसांना टॅग करुन या गोष्टीची दखल घेण्यास भाग पाडलं.

नक्की वाचा >> 'मला अक्कल शिवकणाऱ्यांनी हा स्क्रीन शॉट पाहा, मी तुमच्या..'; कंगनाने दिला 'बोस पहिले PM'चा 'पुरावा'

नेमका काय त्रास द्यायचा हा बॉस?

पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणामध्ये उमाशंकर आणि विनेशला अटक केली. दोघांची कसून चौकशी केली असता कामाच्या ठिकाणी सुरेश त्यांचा बॉस होता आणि तो त्यांना रोज त्रास द्यायचा. दैनंदिन व्यवहाराचा हिशोब दिला जायचा तेव्हाही सुरेश त्यामध्ये नको त्या शंका काढून व्यवहाराला क्लिअरन्स द्यायचा नाही. त्यामुळे अनेक दिवस या कर्मचाऱ्यांना एकाच व्यवहाराचा हिशोब पुन्हा पुन्हा मांडावा लागायचा. सुरेशच्या या वागण्याला कंटाळून दोघांनी एका टोळीला त्याची सुपारी दिली. यातूनच दोघांनी सुरेशला संपवण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी 5 दिवसांनी आरोपींना केली अटक

उमाशंकर आणि विनेशकडून सुपारी घेतलेल्या टोळीने कल्याण नगर येथील आऊट रिंग रोडवर सुरेशला रस्त्याच्या कडेला नेऊन बेदम मारहाण केली. हा सारा प्रकार 31 मार्च रोजी घडला. यानंतर पुढील काही दिवस हा व्हिडीओ बंगळुरुमध्ये प्रचंड व्हायरल झाला. अखेर हिन्नूर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन 5 एप्रिल रोजी 5 जणांना अटक केली.