AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.

Updated: Oct 21, 2023, 11:54 PM IST
AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video title=
AI-Generated Song Shocking ChatGPT Working

Bengaluru Viral Video : इंटरनेटमुळे मानवी आयुष्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालंय. चौथी औद्योगिक क्रांतीच्या रुपात आया एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) उदयाला येत आहे. गेल्या दशकापासून सुरू झालेली ही संकल्पना येत्या काही दिवसात प्रखरतेने वास्तवात उरत आहे. अशातच आता ओपन एआयमुळे (Open AI) सर्वसामान्य लोकांना देखील एआयचा वापर करता येतोय. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. हा व्हिडीओ पाहून एआयची व्याप्ती कितपत असू शकते, याचा अंदाज तुम्हाला देखील येईल. 

दररोज स्वत:ला अतुलनीय असल्याचे सिद्ध करणाऱ्या एआयने आणखी एक पराक्रम केला आहे, तोही हजारो लोकांमध्ये सुरू असलेल्या परिषदेमध्ये... बंगळुरूमधील लोक फ्यूज बँड स्वरथमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये बँडचा गायक चॅट जीपीटीने लिहिलेलं गाण गाताना दिसतोय. एकीकडे गायक गाण गात होता. तर दुसरीकडे गाण लिहिलं जाणार होतं. हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. एआय तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवू शकतो, याचा अंदाज तुम्हाला आला असेल.

पाहा Video

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असा आरोप केला जातोय. याच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढलंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फसवणूक केल्याचा प्रकार देखील समोर आला होता. विज्ञान श्राप की वरदान? असा सवाल विचारला जायचा... मात्र, आता एआय शाप की वरदान? असा सवाल देखील विचारला जाऊ शकतो.

एलॉन मस्क AI च्या मैदानात

एआय इस फार मोर डेन्जरस, असं प्रसिद्ध बिझनेसमॅन एलॉन मस्क यांनी म्हटलं होतं. ट्विटर आणि टेस्ला या कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क यांनी आता AI क्षेत्रात पाऊल ठेवलंय. एलॉन मस्क यांनी स्वत:ची नवीन AI कंपनी लाँच केलीय. ही कंपनी चॅटजीपीटी सारख्या AI कंपन्यांना टक्कर देईल. एलॉन मस्क यांनी एक्सएआय या एआय कंपनीची घोषणा केली होती.