तुमचे पैसे बुडणार नाहीत, सरकार देते हमी; रोज 405 रुपये गुंतवा अन् करोडो मिळवा

PPF Investment Formula: पैशांची गुंतवणूक कुठे व कधी करावी असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत आहेत ना. तर आत्ताच ही बातमी सविस्तर वाचा  

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 28, 2024, 04:40 PM IST
तुमचे पैसे बुडणार नाहीत, सरकार देते हमी; रोज 405 रुपये गुंतवा अन् करोडो मिळवा title=
Benefits of PPF Account in long term tax saving and good return

PPF Investment Formula: तुमचे पैसे सुरक्षित तर राहतीलच पण त्याचबरोबर त्यावर जबरदस्त व्याजदेखील मिळणार आहे. हे दोन्ही फायदे तुम्हाला एका सरकारी योजनेत मिळणार आहे. या योजनेचे नाव आहे पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund) आहे. यालाच पीपीएफ असंदेखील म्हणतात. ही देशातील सर्वात पॉपुलर स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. 

देशातील नागरिक डोळे बंद करुन पीपीएफवर विश्वास ठेवतात. यात गुंतवणुक केल्यास नुकसानीची थोडीदेखील भिती राहत नाही. कारण केंद्र सरकार या योजनेची हमी घेते. जाणून घेऊया पीपीएफ योजनेची वैशिष्ट्ये

पीपीएफमध्ये किती गुंतवणुक करायला हवी?

या सरकारी योजनेत दरवर्षी कमीत कमी 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा आहे. एका आर्थिक वर्षात 1.5 लाखांपेक्षा अधिक जमा झालेल्या रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही. पीपीएफ अकाउंटमध्ये एक रकमी किंवा हप्तात रक्कम जमा करु शकता. 

पीपीएफवर किती व्याज मिळते?

बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉजिटच्या तुलनेत प्रोव्हिडेंट फंडमध्ये जास्त व्याज मिळते. सध्या सरकार पीपीएफमध्ये दरवर्षी 7.1 टक्के व्याज देते. गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. प्रत्येक वर्षी मार्चमध्ये व्याजाची रक्कम दिली जाते. प्रत्येक तीन महिन्यात तिमाही आधारावर व्याजदरांची समीक्षा केली जाते. व्याजदराबाबत अंतिम निर्णय अर्थविभागाचा असतो. 

करात सुट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ही एक उत्कृष्ट योजना आहे. त्यामुळे नोकरदार या योजनेत गुंतवणूक करतात. पीपीएफमध्ये पैसे जमा करून, तुम्ही चांगल्या रिटर्न्ससह कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. तुम्ही आयकराच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता, ज्याची कमाल मर्यादा रु. 1.5 लाख आहे. पीपीएफमधील गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम, तिन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत. पीपीएफमध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.

PPFमधून मध्येच पैसे कसे काढता येतात?

या सरकारी योजनेचा मॅच्युरिटी पीरीयड 15 वर्षांचा आहे. मात्र, गरजेच्या वेळेत तु्हाला पैशांची गरज असल्यास 50 टक्के जमा रक्कम काढू शकता. मात्र. त्यासाठी खाते सुरू केल्यानंतर 6 वर्षे पूर्ण झाले पाहिजे. त्यानंतरच ही रक्कम काढता येते.

PPFमुळं करोडपती कसं बनू शकता?

या सरकारी योजनेत थोडे थोडे पैसे गुंतवून तुम्ही करोडपती होऊ शकता. याचा फॉर्मुला खूपच सोप्पा आहे. रोज 450 रुपये म्हणजेच दरवर्षी 1,47,850 रुपयांची गुंतवणूक करुन 25 वर्षांत सध्या चालु असलेल्या 7.1 टक्के व्याजाच्या आधारे 1 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता. तुम्ही स्वतः PPF Calculaterने पडताळणी करुन पाहू शकता.