भीक मागणारा व्यक्ती एका रात्रीत स्टार

आज याचे लाखो फॉलोअर्स

Updated: Aug 12, 2018, 01:50 PM IST
भीक मागणारा व्यक्ती एका रात्रीत स्टार title=

ब्राझील : एखादा भीक मांगणारा व्यक्ती एका रात्रीत स्टार झाला असं जर तुम्ही ऐकलं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? पण ही गोष्ट खरी ठरली आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर कोणतीही कला असेल तर असं होऊ शकतं. ब्राझीलमध्ये असंच काही घडलं आहे. ब्राझीलच्या साओ पाउलो शहरामध्ये रायमुंडो अरुडो नावाचा व्यक्ती रस्त्यावर बसून भीक मागत असे. येथेच राहणारी महिला रोज या व्यक्तीला येथून येतांना जातांना पाहत असे. तेव्हा हा व्यक्ती भीक मागत असताना काही तरी लिहित देखील असे. एक दिवस या महिलेने त्याच्याकडे जाऊन त्याची चौकशी केली. त्या व्यक्तीने पेपरवर जे काही लिहिलं होतं ते पाहून त्या महिलेला देखील धक्का बसला.

फेसबूकवर शेअर केल्या कविता

रायमुंडोकडे अनेक कागदं होती. ज्यामध्ये त्याने अनेक कविता लिहिल्या होत्या. शाला मोंटीएरो नावाच्या महिलने जेव्हा या कविता वाचल्या तेव्हा ही महिला खूप भावूक झाली. यानंतर ही महिला रोज रायमुंडो सोबत बोलू लागली. रायमुंडोच्या कविता या महिलेने फेसबूक अकाउंटवर शेअर केल्या आहेत. लोकांना देखील रायमुंडोच्या या कविता खूप आवडल्या. लोकांना देखील विश्वास होत नव्हता की या कविता एका भीख मागणाऱ्या व्यक्तीने लिहिल्या आहेत.

शेअर केल्या लाखो कविता

बघता बघता या महिलेने फेसबूकवर लाखो कविता शेअर केल्या. लोकांकडून देखील या कवितांना पसंती मिळत आहे. आता साओ पाउलोमध्ये रायमुंडो प्रसिद्ध झाला आहे. लोकं आता त्याच्या नव्या कवितांची वाट बघत असतात.

फेसबूकवर बनला स्टार

रायमुंडोची वाढती प्रसिद्धी पाहता शालाने रायमुंडोंच्या नावाने एक पेज बनवलं आहे. या पेजवर शाला आता कविता शेअर करते. अनेक जण आता रायमुंडोचे फॅन झाले आहेत. राइमुंडो आता अनेक जण ओळखू लागले आहेत. लोकं आता त्याच्या जवळ येवून बसतात आणि त्याच्या कविता देखील ऐकतात. 

This man was living beggar's life for 35 years, suddenly became star

रायमुंडोचा अवतार बदलला

रायमुंडो प्रसिद्ध झाल्यानंतर शालाने त्याच्या नावाचं एक फेसबूक पेज देखील बनवलं आहे. शालाने रायमुंडोचं मेकओव्हर देखील केलं आहे. रायमुंडोचा नवा अवतार पाहून त्याचा भाऊ देखील त्याला मिळाला. रायमुंडो एक व्यापारी होता जो मिलिट्रीच्या अत्याचारामुळे कुटुंबापासून वेगळा झाला. पैशांच्या अभावामुळे त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली.