मोबाईल सिममुळे तुमच्या बँकेतील पैसे जावू शकतात चोरीला, ही गोष्ट करु नका

सावधान ! ही गोष्ट करु नका

Updated: Jul 12, 2018, 01:20 PM IST
मोबाईल सिममुळे तुमच्या बँकेतील पैसे जावू शकतात चोरीला, ही गोष्ट करु नका title=

मुंबई : मोबाईल आणि इंटरनेट फ्रॉडचे प्रकार सध्या वाढले आहेत. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील समोर येत आहेत. फेक नंबरवरुन कॉल येणे, एसएमएसमधून लिंक येणे, यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. हॅकर्सने आता एक नवी पद्धत वापरली आहे. 'सिम स्वॅप'च्या माध्यमातून काही मिनिटात तुमच्या खात्यातून पैसे ट्रांसफर केले जावू शकतात आणि तुम्हाला याची माहितीही मिळणार नाही. सिम स्वॅप सध्या सायबर-फ्रॉड म्हणून मोठ्या प्रमाणात पुढे आहे. स्मार्टफोन वापरणारे याचे बळी ठरत आहेत. सिम स्वॅपच्या माध्यामातून लोकांना चुना लावला जातो आहे. जर तुम्ही पण स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला पण यापासून सावध राहण्य़ाची गरज आहे.

काय आहे सिम स्वॅप ?

सिमकार्डमध्ये युजरचा डेटा सेव्ह असतो. सिम यूजरच्या ऑथेंटिकेशनसाठी देखील आता वापरला जातं. यामुळेच तुम्ही सिम शिवाय इतर कोणत्याही नेटवर्कशी नाही जोडले जावू शकत. तुमच्याकडे जे सिम आहे ते अचानक बंद होतं आणि दुसरा कोणतातरी व्यक्ती त्या सिमच्या मदतीने तुमच्या अकाऊंटमधील पैसे गायब करतो. तुमचा नंबर सिम हॅक करत हॅकर स्वत:च्या नावाने सुरु करतो. तुमचं अकाऊंट असलेल्या सगळ्या बँकांचा OTP तो जनरेट करतो आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटमधील पैसे तो ट्रान्सफर करता.

कशी होती फसवणूक?

सिम स्वॅप फसवणुकीचा सरळ मार्ग आहे. एका कॉलच्या माध्य़मातून हे सगळं सुरु होतं. तुमच्या फोनवर एक कॉल येतो. टेलीकॉम कंपनीचा एग्जीक्यूटिव बनून हॅकर तुम्हाला कॉल करतो. या कॉलवर तुमचं नेटवर्क आणखी चांगलं बनवण्यासाठी हॅकर ऑथेंटिकेट करण्यासाठी सांगितलं जातं. काही प्लॅन आणि ऑफर देखील सांगितले जातात. कॉलर तुम्हाला तुमच्या सिमच्या मागचा 20 डिजिट नंबर देखील विचारतो. हॅकर्सला तुम्ही 20 डिजिट नंबर दिला की, तो तुम्हाला 1 नंबर दाबायला सांगतो. यानंतर तुमचं सिम स्वॅप होतो. टेलीकॉम कंपनी यानंतर तुमची रिक्वेस्ट स्वीकारतो आणि तुमचं सिम बलॉक होतं आणि दुसऱ्या सिमवर तो नंबर सुरु होतो.

MNP मधूनही होऊ शकतं सिम स्वॅप

MNP च्या माध्यमातून देखील तुमचं सिम स्वॅप होऊ शकतं. पण अशी प्रकरण अजून समोर आलेले नाहीत. पण हॅकर्ससाठी हा देखील एक ऑप्शन आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी तुम्ही मॅसेज पाठवता. त्यानंतर तुम्हाला एक कोड येतो. तो कोड जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागला तरी देखील सिम स्वॅप होऊ शकतं. 

तुम्हाला जर नेटवर्क सर्विस कंपनीमधून बोलतो आहे असा फोन आला तर तुमची माहिती त्याला अजिबात शेअर करु नका. अनोळखी नंबरवरुन एसएमएस आला आणि त्याच कोणतीही लिंक असेल तर त्यालाही क्लिक करु नका. फोनवर तुमची माहिती कधीच कोणाला देऊ नका. बँक तुम्हाला फोन करुन तुमची माहिती कधीच विचारत नाही. प्रत्यक्ष बँकेत जावून तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची असते. तुमचे बँक डिटेल, मोबाईल डिटेल, एटीएम कार्डची माहिती, आधार क्रमांकाची माहिती कोणाला देऊ नका.