मुंबई : रोबोचा सर्वत्र वापर होऊ लागला आहे. रोबो आता युद्धभूमीवरही पाहायला मिळालाय. बोस्टन डायनामिक्स नावाच्या रोबोटिक कंपनीनं कमांडो रोबो बनवला आहे. हा रोबो छापेमारीत एक्सपर्ट आहे शिवाय पोलिसांची सुटका करण्यातही या रोबोचा हात कुणीही धरु शकणार नाही.
सोल्जर रोबोची वैशिष्ट्ये म्हणजे त्याचा निशाणा एकदम अचूक आहे. कुणी त्याला ढकललं. त्याच्यावर प्रहार केला तरी त्यानं लॉक केलेलं टार्गेट त्याच्या टप्प्यातून सुटत नाही. अगदी त्याला जमिनीवर पाडलं तरी त्याचा निशाणा एकदम अचूक असतो.
त्याला गोल फिरवा, त्याचं लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न केला तरीही तो त्याच्या ठरवून दिलेल्या लक्ष्यावर तुटून पडतो. चाचणीदरम्यान त्याच्या वाटेत एक ड्रम टाकला. त्यावरुन पडल्यानंतरही त्यानं अचूक लक्ष्यभेद केला. त्याला ठरवून दिलेल्या लक्ष्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीवर तो हल्ला करत नाही.
त्याच्यादिशेनं जेव्हा गोळ्या झाडल्या जातात. तेव्हा त्याचं अटेंशन आणि पोजिशन एखाद्या मुरब्बी कमांडोलाही लाजवण्यासारखी आहे. एका क्षणात धाडधाड गोळ्या झाडून तो मॅगझिन रिकामी करतो. कमांडो कारवाई करण्यासाठी तो अतिशय उत्तम आहे.
अडथळे पार करणे, खाली वाकून जाणे अशी कामं तो व्यवस्थित करतो. ओलिसाची सुटका करतानाचा त्याचा डेमो अफलातून आहे. एका दुसऱ्या रोबोटची सुटका करण्याचा टास्क त्याला दिलेला असताना तो ओलिस ठेवलेल्या रोबोटचा उचलून दरीत उडी घेतो.
त्यानंतर काही क्षणातच तो रस्त्यावरुन सुसाट पळताना दिसतो. येत्या काही दिवसांत मनुष्यहानी टाळण्यासाठी असा रोबोट लष्करात सामील झाला तर आश्चर्य वाटायला नको.