नवी दिल्ली: चीनच्या ५९ मोबाईल एप्लिकेशन्सवर 59 mobile applications बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय म्हणजे एकप्रकारचा डिजिटल स्ट्राईक असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले. ते गुरुवारी भाजपच्या जनसंवाद रॅलीत बोलत होते. यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले की, भारताला शांती हवी आहे. मात्र, कोणीही देशाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची धमकी भारतामध्ये आहे. आपल्या सीमांचे रक्षण कसे करायचे आणि डिजिटल स्ट्राईक digital strike कसा करायचा, हे भारताला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे.
जाणून घ्या TikTok बंद पडल्याने चीनला किती कोटींचे नुकसान होणार?
आपल्या देशातील लोकांच्या मोबाईलमधील माहितीच्या संक्षणासाठी 59 mobile applications चिनी Apps वर बंदी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि माहितीच्या सुरक्षेबाबत आम्ही कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही, असे रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून चीनकडून होणारी आयात थांबवण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
.... मग NaMo App पण बंद करा; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याची मागणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते उभारणीच्या प्रकल्पांची कंत्राटे चिनी कंपन्यांना न देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. दरम्यान, चिनी Apps वर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाला चीनकडून विरोध करण्यात आला आहे. भारताचा हा निर्णय पक्षपाती आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे चीनने म्हटले होते. तसेच आम्हीदेखील भारतावर अशाप्रकारची डिजिटल बंदी घालू, अशी दर्पोक्तीही चीनकडून करण्यात आली होती.