Bank Loan Recovery:कर्जवसुलीसाठी बँकांचे एजंट धमक्या देतायत? आता घाबरु नका...

रिकव्हरी एजंटसाठी RBI ची नवी नियमावली, परिपत्रक जारी 

Updated: Aug 12, 2022, 07:58 PM IST
Bank Loan Recovery:कर्जवसुलीसाठी बँकांचे एजंट धमक्या देतायत? आता घाबरु नका... title=

Bank Loan Recovery: कर्जवसुलीसाठी रिकव्हरी (Bank Loan Recovery) एजंटकडून दादागिरी, शिविगाळ असे प्रकार सर्रास घडत असतात. पण आता या प्रकारांना चाप बसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) सर्व बँका आणि वित्तीय संस्थांसाठी एक नवीन परिपत्रक जारी केलं आहे. (rbi new circular for recovery agent)

बँक कर्ज (Bank Loan) घेणाऱ्या ग्राहकांना धमकावणे, त्रास देणे या घटना थांबवाव्यात, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. तसंच कर्जदारांच्या नातेवाईकांना, ओळखीच्या व्यक्तींना त्रास देण्याच्या घटनांना आळा घालावा असं यात म्हटलं आहे. हे परिपत्रक सर्व व्यावसायिक बँका, सर्व बिगर बँक वित्तीय कंपन्या, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, वित्तीय संस्था आणि सर्व नागरी सहकारी बँकांना लागू आहे.

सोशल मीडियावर बदनामी करणे थांबवा
इतकंच नाहीत तर ग्राहकाला आक्षेपार्ह मेसेज पाठवणं, सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या धमक्या देणं असे प्रकारही थांबवण्याच्या सूचना बँकेने एजंट्स द्याव्यात असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. अलिकडच्या काही महिन्यांत रिकव्हरी एजंट्सच्या मनमानी कारभाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

नव्या आदेशानुसार सकाळी 8 च्या आधी आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ग्राहकांना रिकव्हरीसाठी फोन केले जाऊ नयेत. तसंच बँकांनी रिकव्हरी एजंटना नियमांचं काटेकोर पालन करण्यास सांगावं. 

बँक किंवा वित्तीय संस्था किंवा त्यांचे एजंटकडून कोणत्याही प्रकारच्या धमकी किंवा छळाचा अवलंब करण्यात येऊ नये असं आरबीआयने स्पष्ट आहे. कर्जाची वसुली करण्याच्या प्रयत्नात कोणत्याही व्यक्तीविरुद्ध शाब्दिक किंवा शारीरिक कृत्यांचा वापर करता येणार नाही असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. जर ग्राहकांकडून तक्रार तर त्यावर गांभीर्याने विचार करु असंही आरबीआयने बजावलं आहे.