Bank Holiday : ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँका

Bank Holiday ची संपूर्ण यादी चेक करा

Updated: Jul 27, 2021, 11:30 AM IST
Bank Holiday : ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँका title=

मुंबई : Bank Holiday in August 2021 : जर बँकेची काम काही राहिली असतील तर आताच हुरकून घ्या. ऑगस्ट महिन्यात अर्धा महिना म्हणजे तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. RBI कडून सुट्टीची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या दिवसांमध्ये फक्त काही राज्यात बँका बंद राहणार आहेत. (Bank Holidays Banks : Bank will closed 15 days in August do the necessary work today, see the complete list of holiday ) 

7 दिवस रविवार आणि शनिवार

1 ऑगस्ट 2021 हा रविवार आहे, म्हणजेच ऑगस्ट महिन्याची सुरूवात ही सुट्टीपासून होत आहे. पहिल्याच दिवशी बँकेला सुट्टी आहे. या दिवशी देशभरातील बँका बंद ठेवल्या जातील. अनेक व्यवहाराची थकबाकी महिन्याच्या पहिल्याच दिवशी राहिली आहे. म्हणूनच, जर तुमच्या बॅंकेचे कोणतेही काम प्रलंबित असेल तर ते आधी सेटल करा. यानंतर 8 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 29 ऑगस्टला रविवारची सुटी येईल. आता दुसर्‍या व चौथ्या शनिवारी देखील सुट्टी असेल. दुसरा व चौथा शनिवार 14 ऑगस्ट व 28 ऑगस्टला असेल. हा दिवस देखील बँक सुट्टी असेल. म्हणजेच, रविवारी 5 सुट्ट्या आणि शनिवारी 2 सुट्ट्यांसह 7 सुट्ट्या फक्त रविवार आणि शनिवारीच आल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी 

1 ऑगस्ट- रविवार
8 ऑगस्ट- रविवार
13 ऑगस्ट- पॅट्रियट टे- इंफाल मध्ये बँका बंद
14 ऑगस्ट- महीन्याचा दुसरा शनिवार
15 ऑगस्ट- रविवार
16 ऑगस्ट- पारसी नववर्ष
19 ऑगस्ट- मुहर्रम (अशूरा)
20 ऑगस्ट- मुहर्रम/फर्स्ट ओणम
21 ऑगस्ट- थिरुवोणम- कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
22 ऑगस्ट - रविवार
23 ऑगस्ट- श्री नारायणा गुरु जयंती- कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
28 ऑगस्ट- महीन्याचा चौथा शनिवार
29 ऑगस्ट - रविवार
30 ऑगस्ट - जन्माष्टमी/कृष्ण जयंती
31 ऑगस्ट- श्री कृष्ण अष्टमी