मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर भारत भयावह परिस्थितीचा साक्षीदार बनला आहे. अनेकांनी कोरोनामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. जवळच्या व्यक्तींच्या जाण्यानंतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. (Bank Account Rule : After death What should be done with Bank Account? ) यामध्ये बँकिंग, इन्श्युरन्सशी जोडलेल्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. या सगळ्यात महत्वाचं असतं 'बँक खातं'.
आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर त्या व्यक्तीच्या बँक अकाऊंटचं काय करायचं? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. या अकाऊंटला बंद करणं योग्य असतं की ते सुरूच ठेवावं? हा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. अशावेळी काय करावं?
जर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्यांच्या खासगी खात्याबद्दल माहित नसेल तर. दोन वर्षांपर्यंत प्रत्येक बँक वाट पाहते. मात्र 2 वर्षांत कोणतेही व्यवहार न झाल्यास बँक ते अकाउंट इनऍक्टिव करतं. यानंतर बँकेकडून खातेधारकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो. अकाऊंटला ऍक्टिव करण्यास सांगितलं जाते.
असंच जर 10 वर्षे होत राहिल. म्हणजे इनऑपरेटिव अकाउंटमध्ये 10 वर्षांपर्यंत कोणताच व्यवहार झाला नाही. तर त्या खात्यातील पैसे आणि त्यावरील व्याज Education and Awareness Fund या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर केले जातात. याची माहिती ग्राहकांच्या कुटुंबियांना दिली जाते.
जर कुटुंबियांना मृत व्यक्तीच्या खात्याबद्दल माहिती असेल. तर त्यांनी ते खातं बंद करण्यासाठी घाई करू नये. मनी 9 च्या रिपोर्टनुसार, फी ओनली इन्वेस्टमेंट एडवाइजर LLP च्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाचे बँक अकाउंट बंद करण्याची घाई करू नये. कारण यामध्ये अशी काही इनकम असेल म्हणजे फॅमिली पेंशन, डिविडेंड, व्याज ज्या कुटुंबियांच्या कामी येऊ शकतात. यामुळे खातं बंद करण्यासाठी घाई करू नये.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने अशी खाती बंद करण्यासाठी कोणता निश्चित कालावधी ठरवलेला नाही. तुम्ही कधीही खातं बंद करण्याचं ऍप्लीकेशन देऊ शकता. जेव्हा कुटुंबीय आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याच्या दुःखातून सावरू शकेल. त्यानंतर त्याने हा निर्णय घ्यावा. RBI च्या आदेशानुसार पैसे काढण्यासाठी बँकेने अर्ज दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करावी.
जर तुम्हाला खातं बंद करायचं आहे. तर तुम्हाला मृत व्यक्तीचे नोटराइज्ड डेथ सर्टिफिकेट बँकेकडे देणं गरजेचं आहे. जर नॉमिनी असेल तर नॉमिनीला सगळे पैसे मिळणार. मात्र जर नॉमिनी नसेल तर कुटुंबातील उत्तराधिकार असलेल्या व्यक्तीकडे हे पैसे सोपवले जातील.