Epileptic Attack : गेल्या आठवड्यात कर्नाटकात (karnataka) एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. बेंगळुरुमध्ये (bengaluru) एका 67 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती. बेंगळुरुच्या जेपी नगरमध्ये पोलिसांना हा मृतदेह सापडला होता. आता या प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. घटनेची संपूर्ण माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या 67 वर्षीय व्यक्तीचा गर्लफ्रेंडसोबत (girlfriend) लैगिंक संबंधादरम्यान मृत्यू झाला होता. लैगिंक संबंधादरम्यान या व्यक्तीला एपिलेप्सी अटॅक (Epileptic Attack) अर्थात अपस्मार किंवा फिट्स आली आणि त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवल्यानंतर त्याचे फोन कॉल डिटेल्स तपासले आणि तो शेवटच्या त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेल्याचे उघड झाले. तपास बाकी असल्याने पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख अद्याप सांगितलेली नाही.
67 वर्षीय व्यावसायिकाचे बेंगळुरूमधील 35 वर्षीय महिलेसोबत संबंध होते. 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो तिच्या घरी गेला आणि बेडवर त्याचा मृत्यू झाला. समाजात नाव बदनाम होईल, या विचाराने घाबरलेल्या महिलेने घाबरून पती आणि भावाला फोन केला. त्यानंतर तिघांनी व्यावसायिकाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधून जेपी नगर येथील निर्जनस्थळी फेकून दिला.
पोलिसांनी तपास करत महिलेला गाठलं. चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की व्यावसायिक घरी आला होता आणि त्याला एपिलेप्सीचा झटता आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. महिलेने पोलिसांना सांगितले की, आपल्या नात्याबद्दल इतरांना कळू नये म्हणून त्याचा मृतदेह फेकून दिला.
पोलिसांनी सांगितले की, व्यावसायिकाने आपण सुनेच्या घरी जातोय असे कुटुंबीयांना सांगून घर सोडले होते. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. व्यावसायिकाच्या नातेवाइकांनी सांगितले की ती व्यक्ती विविध आजारांनी त्रस्त असून ऑगस्टमध्ये त्याची अँजिओग्राफी करण्यात आली होती.
एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल रोग आहे ज्यादरम्यान रुग्णाचे संतुलन पूर्णपणे बिघडते. झटके आल्यावर रुग्णाचे शरीर डळमळायला लागते आणि त्या झटक्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर दिसू लागतो. या समस्येची लक्षणे चेहऱ्यापासून हात-पायांपर्यंत दिसू लागतात. रुग्ण बेशुद्ध होतो, खाली पडतो आणि हात-पायांमध्ये हादरे येऊ लागतात. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस साजरा केला जातो. 2015 मध्ये या दिवसाची सुरुवात झाली.
दरम्यान, एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूतील चेतापेशींच्या क्रियाकलापांमध्ये व्यत्यय येणे. ज्यामुळे एपिलेप्सीचे अटॅक येतात. त्यामुळे मेंदूवरही नकारात्मक परिणाम दिसून येतो. बऱ्याच बाबतीत, हा आजार अनुवांशिक देखील आहे.